India

आरोग्याचा मुलमंत्र..स्मरणशक्ती वाढवण्या चे काही सोप्पे उपाय

आरोग्याचा मुलमंत्र..स्मरणशक्ती वाढवण्या चे काही सोप्पे उपाय

स्मरणशक्ती वाढवायची म्हणजे सर्वात आधी नाव येतं ते बदामाचं. सर्वसामान्यपणे स्मरणशक्ती तल्लग करण्यासाठी बदाम खाल्ले जातात. मात्र फक्त बदामच नाही तर असे इतर काही पदार्थ आणि वनऔषधी आहेत. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. चला तर स्मरणशक्ती वाढण्यासाठी सहजसोपे असे घरगुती उपाय जाणून घेऊयात.

१) सफरचंदाचे सेवन केल्यास मानसिक आजार कमी होतत

सफरचंदांमध्ये कर्साटिन आढळतं जे एक विशेष प्रकारचं अँटिऑक्सिडंट आहे. हे मेंदूच्या पेशी खराब होण्यापासून वाचवतं. जेव्हा मेंदूच्या पेशी खराब होतात तेव्हा यामुळे अनेक गंभीर मानसिक समस्या उद्भवू शकतात. सफरचंदांचं नियमित सेवन केल्यास मेंदूच्या पेशी निरोगी राहतात. ज्यामुळे पार्किन्सन, अल्झायमरसारख्या आजारांना प्रतिबंध होतो.

२) माशांच्या तेलामुळे देखील मेमरी वाढेल

फिश ऑइल म्हणजेच माशांपासून तयार होणारं तेलदेखील स्मृती वाढवण्यात मदत करतं. फिश ऑइलमध्ये ओमेगा -3 फॅटी अँसिड, इकोसापेंटेनिक अँसिड आणि डोकोहेक्सॅनोइक अँसिड असतं. या सर्व गोष्टी मानसिक ताणतणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. फिश ऑइल वृद्धांची स्मृती देखील सुधारू शकतं.

३) ब्राह्मी स्मृती वाढवण्यासाठी आहे आयुर्वेदिक औषध

स्मृती आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी ब्राह्मी हे एक चांगले आयुर्वेदिक औषध आहे. ब्राह्मीमध्ये सिटगॅमेस्टेरॉल आणि बॅकोसाइडसारखे घटक असतात, जे मेंदूचं कार्य वाढवण्यात मदत करतात. बरेच लोक तणाव कमी करण्यासाठी ब्राह्मी तेलानं मालिश करतात. ब्राह्मी तेल केसांना दाट आणि मजबूतदेखील बनवतं.

४) शंखपुष्पी

शंखपुष्पीचा वापर ताणतणावसारख्या समस्या दूर करतं. त्यात भरपूर अँटी-ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारतं. शंखपुष्पीचं सेवन करून निद्रानाश आणि चिंता यासारख्या समस्या नाहीशा.

५) पुरेशा झोपेमुळे स्मरणशक्ती देखील वाढेल

केवळ मेंदूसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी देखील झोपेची खूप आवश्यकता असते. परिपूर्ण झोपेमुळे शरीराची झीज आणि कमतरता भरून निघते. व्यस्त जीवनशैलीमुळे बर्‍याच लोकांना पुरेशी झोप घेता येत नाही यामुळे मानसिक आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम होतो, म्हणून भरपूर झोपे घ्या आणि निरोगी व्हा.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button