India

आरोग्याचा मुलमंत्र निरोगी डोळ्यांसाठी काही कानमंत्र

आरोग्याचा मुलमंत्रनिरोगी डोळ्यांसाठी काही कानमंत्र

तुम्हाला माहितीये का, आपल्या शरीरातील सर्वात सक्रिय मांसपेशी या डोळ्यांमध्ये असतात. याचबरोबर डोळे आपल्या शरीरातील सर्वात सुंदर आणि नाजूक भाग देखील आहे. डोळे आपल्या शरीरातील महत्त्वपुर्ण भाग आहेत, असे म्हटले तरी देखील चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

१) गवतात अनवाणी पायाने चाला –

डोळ्यांसाठी पाय कसे जबाबदार असतील, असे तुम्हाला वाटत असेल. मात्र हे खरे आहे की, गवतात काही वेळ चालल्याने तुमच्या मेंदूला आराम मिळतो. जेव्हा तुम्ही दवबिंदू असणाऱ्या गवतावर चालता त्यावेळी त्याचा परिणाम बोटांवर होतो. त्याच डोळ्यांचे मुख्य रिफ्लेक्सोलॉजी दबाव बिंदू असतात, जे चांगल्या दृष्टीसाठी उत्तेजित करतात.

२) डोळ्यांचा व्यायाम –

कॉम्प्युटर स्क्रीनवर जास्त वेळ काम केल्याने तुमची दिसण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे डोळे दुखू लागतात व आग होते. डोळ्यांची करणे हा असाच एक व्यायाम आहे. त्यामुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होतो. डोळ्यांसाठी आणखी एक व्यायाम म्हणजे डोळ्यांना चारही बाजूंना फिरवणे. 10 मिनिटे डोळे चारही बाजूंना फिरवा. त्यानंतर डोळे बंद करून दोन मिनिटे आराम करा. हा व्यायाम रोज केल्याने तुमचा चष्मा देखील सुटेल.

३) आहार –

डोळ्यांवरील चष्मा दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहार आहे. चांगल्या दृष्टीसाठी या गोष्टींचे सेवन करा. हिरव्या पालेभाज्या, आणि सॅल्मन, विटामिन-सी संत्री आणि लिंबू, दूध, गाजर, पालक, पपई, द्राक्षे, ब्लूबेरीज यांचे सेवन करा. याशिवाय जास्त पाणी प्या आणि धुम्रपान करू नका.

४) पापण्यांना गरम करणे –

कॉम्प्युटर आणि मोबाईल टक लावून काम केल्यामुळे डोळे कोरडे पडत असतात. अशा वेळी पापण्यांना गरम करणे, ऊब देणे महत्त्वाचे असते. आपल्या दोन्ही हातांना एकमेंकांवर घासा आणि गरम हातांना डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवा. असे 3-4 वेळा करा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button