India

आरोग्याचा मुलमंत्र…आरोग्यास हितकारी चंदन

आरोग्याचा मुलमंत्र…आरोग्यास हितकारी चंदन

पूजाविधीमध्ये चंदनला खूप महत्व आहे. अनेक कार्यात त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चंदनाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

चंदनाचा वापर कसा कराल-

१) उन्हाळ्यात अंगाला घाम आल्यामुळे येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी चंदनाच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्याने अंगोळ करू शकता.

२) ताप आल्यास कपाळावर चंदनाचा लेप लावल्यास अंगामधील उष्णता कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ताप लवकर उतरू शकतो.

३) उन्हात घराबाहेर पडल्यामुळे डोके दुखत असेल तर डोक्यावर चंदनाचा लेप लावल्यामुळे डोकेदुखी कमी होते.

४) चेहऱ्यावरील सनटॅन, पुरळ, घामोळे दूर करण्यासाठी चंदनाचा लेप लावू शकता.

५) भाजलेल्या जखमेवरील दाह कमी करण्यासाठी त्यावर चंदनाचा लेप लावू शकता.

६) डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी चंदनाचा लेप डोळ्यांच्या खाली लावा.

७) दररोज सकाळी चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यामुळे दिवस प्रसन्न जाऊ शकतो.

८) चंदनाचा लेप अथवा टिळा दोन भुवयांच्या मध्ये लावल्यामुळे एकाग्रता वाढते.

९) निद्रानाशाच्या समस्येवर डोक्यावर चंदनाचा लेप लावल्यामुळे झोप लागण्यास मदत होते.

१०) मानसिक ताण अथवा नैराश्याची समस्या असल्यास घरात चंदनाचा धुप लावल्यास मन प्रसन्न होण्यास मदत होते.

११) केसांच्या समस्या दूर करण्यासाठी चंदनाचे तेल केसांमध्ये लावल्यामुळे थंडावा मिळू शकतो.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button