Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र..गुणकारी सफरचंद

आरोग्याचा मुलमंत्र..गुणकारी सफरचंद

लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे.

सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबान इलाज आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोहा सारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात.

सफरचंदाचे उपयोग पुढीलप्रमाणे:

1. सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

2. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

3. सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते.

4 .सफरचंदाच्या रसात गुलाब जलाचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते.

5. केसातील कोंडा कमी करण्यासाठी रोज नियमितपणे सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्या केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.

६. जर तुम्हाला यकृता संबंधित काही गंभीर समस्या असेल आणि त्यावरील उपचार सुरु असतील तर बिनदिक्कतपणे दररोज एक सफरचंद खावे. सफरचंदाचा रस यकृताचे आजार बरे करण्यास कारक ठरतो. सफरचंद शरीरात वाढणा-या अतिरिक्त चरबीला रोखते.

७. सफरचंद आयुर्वेदिक गुणकारी फळ आहे, कॅमिकल टाकून तयार केलेले सफरचंद बाजारात असल्यामुळे सफरचंद नीट बघून घ्यावेत आणि स्वच्छ धुवून खावेत.

८. सफरचंद नेहमी साली सकट खाल्लं पाहिजे. सफरचंद संपूर्ण चावू चावून खाल्लं पाहिजे जेणे करुन तोंडातच त्याचा रस बनेल आणि साल घशात अडकणार नाही. सफरचंदाचा ज्यूस पिऊ नये. कारण ज्यूस बनवताना यामध्ये साखर टाकली जाते. तसेच यातील तंतू वेगळे झाल्याने त्यात फायबरची मात्रा राहत नाही. यासोबतच सफरचंद रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण पोटात काहीच नसताना जर तुम्ही सफरचंदाचे सवन केले तर अॅसिडीटी, गॅस, अस्वस्थता होऊ शकते. सकाळी नाश्त्याच्या १ तासानंतर व लंचच्या १ ते २ तासानंतर सफरचंदाचे सेवन करणे सर्वात जास्त लाभदायक ठरते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथीक तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button