India

आरोग्याचा मुलमंत्र…शिंगाडा खाण्याचे औषधी फायदे

आरोग्याचा मुलमंत्र…शिंगाडा खाण्याचे औषधी फायदे

शिंगाडा पाण्यात उगवणारी वनस्पती आहे.याची वेल असून पाने पाण्यावर तरंगतात. फळे त्रिकोणी आकाराची असतात. त्यांना शिंगाडे म्हणतात. शिंगाडे कच्चे किंवा उकडून खातात. शिंगाडा पौष्टिक असतो. याचे वाळवून पीठ करून लाडू बनवून खातात.उत्तरभारतात, विदर्भात, मध्यप्रदेशातील अनेक तलावांमध्ये शिंगाड्याची शेती केली जाते.शिंगाड्यामध्ये मधुर, शीत, रक्तपित्त, दाह, मेह, अवष्टंभक इ. गुणधर्म असतात.

ऊपवासाला वापरले जाणारी भारतातील वनस्पती म्हणजे “शिंगाडा”. ईंग्रजीत याला “water chestnut” असे नाव आहे.

पोषणमुल्ये :

Carbs-23.9mg
Suger-4.8mg
Fiber-3mg
Fat-0.1mg
Protein-1.4mg
Vitamins in percentage – B1-12%, B2-17%, B3 7%, B5-10%, B6-25%, B9-4%, Vitc-5%, Vit E-8%

भरपुर पोषणमुल्ये,कमी calories आणि low fat असणारा शिंगाडा म्हणजे निरोगी आहाराची गुरुकिल्लीच.

औषधी उपयोग:-

अतिसारावर शिंगाड्याचे पीठ ताकात मिसळून द्यावे. जीवनसत्व 6 मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांचा विकारात याच्या सेवनाने फायदा होतो.

शिंगाड्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने हाडे आणि दात मजबूत होतात.रक्त-पित्तावर शिंगाडे व कचोरा यांचा शिरा करून खावा.

मुका मार लागून सूज आल्यास शिंगाड्याच्या पीठाचा लेप करावा.धातुपुष्टतेसाठी शिंगाड्याचे लाडू करून द्यावे.शिंगाड्याच्या अतिसेवनाने अपचन, पोटदुखणे, सर्दी, खोकला इ. विकार होऊ शकतात.कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महिलांनी गरोदरपणात शिंगाड्याचे सेवन केल्याने आईचे आरोग्य आणि बाळाचे पोषण चांगले होते. प्रमेहरोगामध्ये शिंगाडा व जायफळ उगाळून द्यावे.शिंगाड्यामध्ये फायबर्सचे प्रमाणही भरपूर असल्याने याचे सेवनाने पोट साफ राहते. तसेच मधुमेहातील शुगर, कॅन्सर, हृदयविकार यांचा धोका कमी होण्यास मदत होते.

शिंगाड्यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रीत राहण्यास मदत होते.सारखे पाय किंवा टाचांना भेगा पडत असतील तर शिंगाड्याचे सेवन केल्याने बरे होण्यास मदत होते. कारण यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते.काविळ झाल्यास ती लवकर बरी होण्यासाठी शिंगाडा द्यावा.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमोिओपॅथिक तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button