Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र..अपचन आणि उपचार

आरोग्याचा मुलमंत्र…अपचन आणि उपचार

अपचन हे सहसा व्यायाम ना करणाऱ्या बऱ्याच लोकांना होते. हा काही गंभीर आजार नाही आणि तो घराच्या घरी बारा केला जाऊ शकतो. या पोस्ट मध्ये आपण अपचन, जळजळ तत्याची लक्षणे आणि भरपूर घरगुती उपाय पाहूया.

अपचनाची लक्षणे

– छातीत जळजळ – छातीत वेदनादायक जळजळ होण्याची भावना
– काही न खाता पोट पूर्ण आणि फुगलेला जाणवते
– सतत ढेकर येणे आणि पोटात गॅस होणे
– तोंडाची चव कडू होणे

=> अपचन घरगुती उपाय

1. करपट ढेकर येत असतील, अजीर्ण झाले असेल, तर अर्धे लिंबू घेऊन त्यावर एक चिमटी सुंठ पावडर टाकून, एक चिमटी सैंधव मीठ टाकावे व हे लिंबू गरम करावे. निखाऱ्यावर खदखदू लागले की, उतरवून थोड्या वेळाने थोडेथोडे चोखत राहावे.

2. जास्त जेवणामुळे अजीर्ण झाल्यास पाव चमचा मिरपूड + एक चमचा आल्याचा रस एकत्र करून घ्यावे.

3. अपचन होऊन करपट ढेकर येत असतील तर, तसेच उलटीही होत असेल; तर आठ-दहा वेलदोडे घेऊन चार वाट्या भरून पाण्यात राकावेत, ते उकळून पाव वाटी करावे व त्यात अर्धा चमचा साखर टाकावी. हा काढा दिवसातून चार वेळा घ्यावा.

4. अजीर्ण झाले असल्यास अगर पोटफुगी झाल्यास अर्धा चमचा साजुक तुपात चार लसणाच्या पाकळ्या ठेचून, तळून लालसर झाल्यावर खाव्यात.

5. अपचन झाले असेल तर अगर तोंड आले असेल तर एक चमचा लोणी घेऊन दोन चिमट्या जिरेपूड व दोन चिमट्या साखर घालून ते मिश्रण सकाळ, दुपार व संध्याकाळी घेतल्यास तक्रार दूर होते.

6. लोणी काढल्यावर जे ताक शिल्लक राहते, त्या ताकाला सैंधव मीठ थोडेसे लावून ते प्याल्यास अजीर्ण पळून जाते.

7. अजीर्णामुळे पोट दुखत असेल तर एक चमचा आल्याचा रस घ्यावा. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा व चिमटीभर मीठ घालून प्यावे.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button