Amalner

Amalner: 3 महिन्या पूर्वी वेटरचा मृत्यु… मालकच खूनी..!

Amalner: 3 महिन्या पूर्वी वेटरचा मृत्यु… मालकच खूनी..!

अमळनेर हॉटेल मालकानेच वेटरच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आला आहे. हॉटेलबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीतून हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांच्या फिर्यादीवरून हॉटेलमालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मयतांचे नाव असून नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी(वय ३५)राहणार माळीवाडा, अमळनेर असे आरोपीचे नाव आहे.

नरेंद्र चौधरी याची शहरातील सुजाण मंगल कार्यालयाजवळ साई व रुपाली हॉटेल असून दगडू पाटील हे तेथे वेटर म्हणून काम करीत होते. दगडू पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून विभक्त राहून अमळनेर येथे हॉटेलवर काम करीत होते. हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने २२ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली होती. त्यानुसार सकाळी सहा वाजता हॉटेल कडे चक्कर मारला असता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम होती व छातीला खरचटले होते. तेथून नरेंद्र याने खासगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्याला सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देऊन उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते.
६ मे रोजी त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता. मात्र सुरत येथील अहवाल आणि दगडू पाटील यांच्या अंगावरील जखमा आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार तफावत आढळून आल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी घटनस्थळजवळील फुटेज तपासले असता २२ रोजी पहाटे मालक नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू पाटील याला मारहाण करीत होता. दगडू खाली पडल्यावर त्याच्या छातीवर व डोक्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होता. तसेच जवळील पडलेली लोखंडी वस्तू उचलून दगडू च्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला. आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला.
दगडू चा मृत्यू नरेंद्र याच्या मारहाणीनेच झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस घनश्याम अशोक पवार याच्या फिर्यादीवरून नरेंद्र चौधरी (वय ३५) राहणार माळीवाडा याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button