India

आरोग्याचा मुलमंत्र…केसांची काळजी

आरोग्याचा मुलमंत्र…केसांची काळजी

केसांमध्ये कोंडा होणे ही समस्या आज अनेकांमध्ये दिसून येते.
केसामध्ये कोंडा होण्यामागे कारणं असतात.
केसांमध्ये कोंडा झाल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करुन ही समस्या लांब ठेऊ शकता.

जर डोक्याच्या त्वचेची नियमित साफसफाई होत नसेल तर डोक्यात कोंडा बनतो. कोंडा होणे ही समस्या केस स्वच्छ न घुतल्यास घाम ग्रंथी मोकळ्या होत नाहीत. म्हणून केसातील कोंडा काढून टाकण्यासाठी केस साफ करणे फार महत्वाचे आहे. यासाठी, हर्बल शैम्पूने किंवा घरगुती शिकेकाई वापरून दर तिसर्‍या दिवशी केस धुवावेत. केस धुण्याआधी केसांना कोमट तेलाने मालीश करायला विसरु नका.

काही घरगुती उपाय :-
१. दोन-तीन दिवसाचे शिळे (आबंट दही), थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी करता येतो.

२. थंड पाण्याने केस धुवून अत्यंत जोराने केसांना मुळापर्यंत बोटांनी घासणे यामुळे केस गळती आणि कोंडा होत नाही.

३. मेथीच्या पुडीला पाण्यात टाकूण लेप तयार करावा आणि तो डोक्यावर लावावा. एक तासानंतर डोकं धुवून घ्यावे.

४. केस धुतांना लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.

५. बीटची मुळं पाण्यात घालून पाणी उकळावं आणि त्या पाण्याने रोज रात्री डोक्याला मसाज करावा.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
[ होमिओपॅथी तज्ञ ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button