India

आरोग्याचा मुलमंत्र..फंगल (खाज) इन्फेकशन लक्षणें व उपाय

आरोग्याचा मुलमंत्र..फंगल (खाज) इन्फेकशन लक्षणें व उपाय

त्वचे वर खाज, लाल चट्टे, पुरळ येणे हे फ़ंगल इन्फेकशन मुळे होऊ शकते. याला विशिष्ट ऋतू जबाबदार नसून कुठल्याही ऋतूत होऊ शकते.
गोल आकारात पुळ्या येऊन खाज येते. संक्रमित व्यक्तीच्या वस्तू कपडे, टॉवेल याद्वारे इतरांना हा आजार होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास हा त्रास वाढत जातो. अनेकदा ट्रिटमेंट करूनही समस्या दीर्घकाळ राहते. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून बचाव करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.

लक्षणं

– त्वचेला खाज येणे.
– त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे.
– त्वचेतून पांढऱ्या रंगाचा पदार्थ निघणे.
– भेगा पडणे.
– फटी पडणे.
– सतत केस गळणे.
– नखं पिवळी किंवा काळे पडणे.

उपाय

अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यात मदत करतं. फंगल इन्फेक्शनमध्ये अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर केल्यास इन्फेक्शन कमी होतं. याने रॅशेज, खाज आणि जळजळ दूर केली जाते. यासाठी अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचेवर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा धुवावी.

कडूलिंबाची झाडे तुमच्या आजूबाजूला बरीच असतील. या झाडाच्या पानांची पेस्ट, काढा
प्रकारचे फंगल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. कडूलिंबातील तत्व, जे एकप्रकारे अ‍ॅंटी-फंगल गुणाने भरपूर असतात. यासाठी कडूलिंबाची पानं बारीक करून पेस्ट तयार करा. यात एक चमचा लिंबाचा रस आणि हळद टाका. फंगल इन्फेक्शन झालेल्या भागात ही पेस्ट लावा. ३० मिनिटांनी ही पेस्ट लावूनच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा. याने त्वचा आणि डोक्याच्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतील

घट्ट कपडे घालू नका, ओले मोजे घालू नका, दररोज कपडे आणि यांना उन्हात वाळवा, नेहमी सैल आणि सुती कपडे घालणे चांगले आहे, वेळच्यावेळी नखं कापा, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल साबणाचा वापर करा. दुसऱ्यांचे कपडे, कंगवा, टॉवेल वापरू नका. याचा उपचार मध्येच सोडू नका. नाहीतर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button