India

आरोग्याचा मुलमंत्र..पुष्प औषधी एक होमिओपॅथीक उपचार पद्धती (Gental treatment)

आरोग्याचा मुलमंत्र..पुष्प औषधी एक होमिओपॅथीक उपचार पद्धती (Gental treatment)

पुष्प चिकित्सा ही होमिओपॅथीमधील उपचारांची एक विशिष्ट पद्धत आहे. यात पुष्पांचे विविध भाग वापरून औषधोपचार केला जातो. त्यासाठी फुलांच्या सौम्य द्रावणाचा वापर केला जातो. या पद्धतीचा जनक एडवर्ड बाश हा आहे. त्याने या पद्धतीचा शोध सन १९३०मध्ये लावला.
वनस्पतीवर आलेल्या फुलांवर पडणाऱ्या दवबिंदूंमध्ये त्या वनस्पतीचे गुण उतरतात, असा बाशचा विश्वास होता. त्या दवबिंदूंचे द्रावण औषधाप्रमाणे वापरून तो उपचार करीत असे.
1900 च्या दशकाच्या सुरुवातीस हर्ले स्ट्रीटचे फिजीशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. एडवर्ड बाच यांनी 38 उपचार पद्धतींचा शोध लावला, जो मूळतः ३७ फुले आणि धबधब्याच्या पाण्याचे अर्क घेऊन बनवले आहे. यामध्ये धबधब्याचे पाणी हे उच्च कंपन मानले जाते. यामध्ये कुठलेही बायोकेमिकल पदार्थ नसून या पाण्याचा त्या फुलावर कंपन होत असल्याचे बोलले जाते. हे कंपन प्राणी आणि मनुष्यांच्या कंपनापेक्षा जास्त असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत होते.

गर्भारपण, प्रसूती व बाळाचा जन्म ह्या तीनही अवस्थांमध्ये बाईच्या मानसिक भावना महत्त्वाच्या असतात. अशा वेळी स्त्रियांच्या शरीरावर व मनावर येणाऱ्या ताणासाठी बाख औषधी हा उत्तम उपाय आहे. मनातील भीतीसाठी “मिम्युलस” व खूपच भीती वाटत असेल तर “रॉक रोज” ही औषधे. मन व शरीर शांत राहण्यासाठी, आराम वाटण्यासाठी “व्हरव्हेन” व “इम्पेशन्स” ही औषधे लागू होतात. प्रचंड तणावाखाली वावरत असूनही हसरा मुखवटा धारण करणाऱ्या व्यक्तींसाठी “ॲग्रीमनी”. शरीर व मन दोन्हींची शुद्धी करणारे औषध, एखाद्या गोष्टीची, व्याधीची घृणा वाटणे यासाठी “क्रॅप ॲपल”. कुठल्याही प्रकारच्या बदलास किंवा नवीन परिस्थितीस सामोरे जावे लागल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी “वॉलनट”. सकारण भीती, चिंता म्हणजेच परीक्षा, एखादा रोग, अंधार, मृत्यू, वृद्धत्व इ. बद्दल वाटणारी भीती याकरिता “मिम्युलस” हे औषध अत्यंत गुणकारी आहेत.

“रेस्क्यू रेमेडी” ह्या औषधाच्या नावातच त्याचा उपयोग कळून येतो. आणीबाणीच्या प्रसंगी (उदा.अपघात, मृत्यू इ.) किंवा अचानक बसलेल्या धक्क्यातून मनाला सावरणारे औषध घराघरातून First Aid म्हणून अवश्य संग्रही ठेवण्यासारखे हे औषध आहे. रेस्क्यू रेमेडी हे ५ औषधे मिळून केलेले एक औषध आहे. ह्यातील पाचही औषधे वेगवेगळया कारणांसाठी उपयोगी आहेत.

१. स्टार ऑफ बेथलहेम – एखाद्या घटनेचा धक्का (शॉक) बसल्यास
२. रॉक रोज – भीती वाटणे व गोंधळ घालणे
३. इम्पेशन्स – मानसिक त्रास, चंचलता
४. चेरी प्लम – नैराश्य
५. क्लीमॅटिस – मूर्च्छितावस्था
मधमाशांचा दंशयुक्त वेदना असह्य असतात. अशा वेळी रेस्‍क्यू रेमेडी दिल्यास सूज उतरते आणि वेदना पण कमी होतात. दाढ दुखत असेल, तरी रेस्‍क्यू रेमेडी हा चांगला उपाय आहे.
डॉ.एडवर्ड बाख यांनी पुष्पौषधीच्या स्वरूपात मानवाला दिलेले हे एक वरदानच आहे.

वरील औषधी डॉक्टरांच्या मार्गदर्शना खाली घ्यावी. रुग्णाची शरीरयष्टी व आजाराचे गांभीर्य या वर औषदाची पोटेन्सी अवलंबून असते म्हणून होमिओपॅथिक डॉक्टरांच्या साल्याने घ्यावी.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथिक तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button