India

आरोग्याचा मुलमंत्र…मटक्याच पाणी गार, देई आरोग्यास फायदे फार

आरोग्याचा मुलमंत्र…मटक्याच पाणी गार, देई आरोग्यास फायदे फार

माठातील पाण्याची चव निराळी असते आणि त्याचे फायदे देखील अनेक आहेत. माठातील पाण्याला मातीचा गंध येत असतो. माठातील पाणी आपल्या आरोग्यासाठी नेहमी चांगले असते. तसंच या पाण्यामध्ये मातीतील अनेक तत्व असतात जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. आज आपण माठातील पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
या उन्हाळ्यात लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाला काहीतरी थंड खावं किंवा पेय प्यावसं वाटतं! मग त्यात सरबत, कोल्ड्रिंक्स, बर्फाचा गोळा, आईस्क्रीम असे तत्सम प्रकार सगळ्यांनाच खावेसे वाटतात!
हळू हळू सगळीकडेच उन्हाच्या झळा बसायला लागल्या कि प्रत्येकाला अगदी जावं नकोसा होईल, याचबरोबर उन्हाचे त्रास सुद्धा वाढीस लागतील, त्यामुळे आता प्रत्येकाने आपल्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायला हवं.
आपल्या पूर्वजांनी मातीचं महत्त्व जाणलं होतं म्हणूनच त्यांनी माठाची निर्मिती केली होती. अजूनही खूपशा कुटुंबात माठाचा वापर केला जातो. माठातलं पाणी प्यायल्यावर जी क्षुधा शांती होते ती फ्रीजमधल्या पाण्याने होत नाही.

फ्रिज च पाणी प्यायल्या ने शरीरास नुकसान होते ही गोष्ट आता लपून राहिलेली नाहीये.

चालतर मग पाहूया मठातलं पाणी पिल्याचे फायदे

१) मुळातच मातीमध्ये औषधी गुण असतातच त्यामुळे त्यातील पाण्याला एक निराळा स्वाद, गोडसर चव येते आणि हे शुद्ध पाणी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

२) गर्भवती महिला किंवा लहान मुले यांनी माठातील पाणी प्यायले तर त्यांना काही त्रास होत नाही.

३) मातीच्या भांड्यात हवामानानुसार पाणी असते ही एक गुणवत्ता इतर कोणत्याही भांड्यात नसते.

४) खोकला किंवा सर्दी असलेल्या लोकांनीही मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यास त्यांना अपाय होत नाही.

५) माती नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असल्याने शरीरात पीएच शिल्लक ठेवण्यास मदत करते आणि अम्लता आणि गॅस्ट्रोनॉमिक वेदना कमी होतात.

एवढे फायदे मातीच मटक आपल्याला देत म्हणून याला मातीच फ्रीज म्हणतात.
अशे अजून बरेच फायदे मातीच फ्रिज आपल्याला देते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथीक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button