India

आरोग्याचा मुलमंत्र…शेंगदाण्याची चिक्की देई आरोग्य नक्की

आरोग्याचा मुलमंत्र…शेंगदाण्याची चिक्की देई आरोग्य नक्की

चिक्की खाल्ल्याने शरीराला भरपूर लाभ मिळतात. स्किन चकाकते, मधुमेह नियंत्रित राहतो आणि हृदयाशी निगडीत समस्या देखील दूर होतात. तसंच शरीर गरम राहण्यास मदत होते. चिक्कीमध्ये असलेले मोनेअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड हृदयाची काळजी घेतात.

स्ट्रेस कमी करते

मेंदू हा आपल्या शरीराचं पावर हाऊस असतो जो शरीराला व्यवस्थित पद्धतीने कार्य करण्यासाठी आदेश देतो आणि सर्व निर्णय घेतो. पण वाढत्या वयासोबत मेंदू देखील कमजोर होऊ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की मेंदूने आयुष्यभर चांगलं काम करावं तर आरोग्यवर्धक पदार्थ खाऊन आपण आपला मेंदू निरोगी व सुदृढ ठेऊ शकतो. चिक्कीमध्ये अनेक अ‍ॅंटीऑक्सिडंट आणि फाइटो फेनोल्स असतात जे मेंदूशी निगडीत साधारण समस्या जसं की डिमेंशिया, स्ट्रेस, चिंता व अल्जाईमरशी लढण्यासाठी आपली मदत करतात.

शरीरिक विकासास कारणीभूत

हिवाळा जवळ येताच आपली शारीरिक श्रम किंवा क्रिया जसं की एक्सरसाइज, जिम, योग हे खूप कमी होतात. हे आपली मेटाबॉलिज्म प्रक्रिया संथ करतात ज्यामुळे आपल्या शारीरिक विकासात अडथळा येतो. यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला भरपूर अ‍ॅमिनो अ‍ॅसिडयुक्त पदार्थ खाणं गरजेचं असतं. जे की गुळ व शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे या काळात शारीरिक विकास योग्य व्हावा असं वाटत असेल तर गुळाची चिक्की किंवा शेंगदाण्याची चिक्की आवर्जून खावी.

मधुमेहातही मदत

मधुमेह हा एक असा आजार आहे जो बरा तर केला जाऊ शकत नाही पण स्वस्थ लाइफस्टाइल आणि योग्य खानपानाने कंट्रोल तर केला जाऊ शकतो. जर आरोग्य मंत्रालयाचा रिपोर्ट पाहिला तर मॅग्निजने परिपूर्ण असलेली चिक्की मधुमेहाचे रुग्ण देखील योग्य प्रमाणात खाऊ शकतात. असं यामुळे कारण मॅग्निज चरबी व कार्बोहायड्रेट वाचवण्याचं काम करते ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. तर मंडळी, चिक्कीचे अनेक आरोग्यदायी लाभ आहेत पण आपल्या आहारात कोणताही बदल करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

त्वचे संबधी फायदे

जस जसा थंडी वाढू लागते तस तसं त्वचेच बदल होऊ लागतात. अशा परिस्थितीत तुम्हाला उन्हाळ्यातील स्किन केयर रूटीन सोडून थंडीच्या हिशोबाने त्वचेची काळजी घेणारे व त्वचेला पोषक तत्वांची पूर्ती करणारे स्किन केअर रूटीन फॉलो करणे आवश्यक असते. त्वचेची बाहेरुन काळजी घेण्यासाठी तर आपण अनेक उपाय वापरु शकतो पण या काळात त्वचेला शरीराच्या आतून देखील पोषणाची आवश्यकता असते. चिक्कीमध्ये अनेक प्रकारचे सुजनविरोधी गुणधर्म असतात जे त्वचेच्या समस्या दूर करतात. शेंगदाण्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई, झिंक आणि मॅग्नेशियम आपली स्किन चमकदार व निरोगी ठेवतात.

हृदय रोगांमध्ये फायदा

शेंगदाण्यात असणाऱ्या Resveratrol या अँटी ऑक्सिडेंन्ट मुळे हृदय रोगाचा व कॅन्सर चा धोका कमी होतो

शेंगदाण्यात असणाऱ्या Phytosterol मुळे कोलेस्ट्रोल च प्रमाण आटोक्यात राहते.

कोणताही उपाय करण्या आगोदर डॉक्टरां चा सल्ला अवश्य घ्या.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button