India

आरोगाचा मुलमंत्र..बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाचणी

आरोगाचा मुलमंत्र..बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाचणी

नाचणी, ज्याला फिंगर मिलेट किंवा रागी म्हणूनही ओळखले जाते, त्यामध्ये प्रथिने, लोह आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात. भारत हा जगभरात, नाचणीचे उत्पादन करणारा एक अग्रगण्य देश आहे. या संपूर्ण धान्यात फेनिलालाइन, मेथिओनिन, आइसोल्यूसीन आणि ल्युसीन ह्यासारखी महत्त्वपूर्ण अमीनो ऍसिड्स असतात. दुष्काळ असतानाही नाचणीची लागवड करता येते.
निरोगी आहार ह बाळाची निरोगी वाढ आणि विकासासाठी महत्वाचा असतो. निरोगी खाणे लवकर सुरु करणे केव्हाही चांगले असते. आपल्या बाळास निरोगी खायला घालून तुम्ही बाळासाठी तंदुरुस्त जीवनशैलीचा पाया घालत आहात. तुमच्या मुलाच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे असे पोषक धान्य म्हणजे नाचणी होय, जे त्याच्या असंख्य फायद्यासाठी सुपर-फूड म्हणून ओळखले जाते.

• बाळांसाठी नाचणीचे आरोग्यविषयक फायदे :-

१) कॅल्शियमचा स्रोत :-
नाचणीतील कॅल्शियमचे प्रमाण अत्यंत जास्त आहे आणि म्हणूनच आपल्या मुलाच्या वाढत्या हाडांसाठी फायदेशीर आहे. हाडांच्या फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी करण्यास आणि कॅल्शियमच्या सप्लिमेंट्सची आवश्यकता दूर करण्यास नाचणी मदत करते. त्याशिवाय, नाचणी मानवी शरीरामध्ये रक्ताचे उत्पादन सुधारते.

२) लोहाचा स्रोत :-
नाचणीमध्ये असलेले नैसर्गिक लोह मुलांमधील ऍनिमिया रोखू शकते. अंकुरलेल्या नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे लोह शोषण्यास मदत होते. नाचणीमधील उच्च पौष्टिक सामग्रीमुळे, बाळांमधील कुपोषण प्रतिबंधित होते.

३) मधुमेहाचा धोका कमी करते
फायबर आणि पॉलिफेनॉल मोठ्या प्रमाणात असल्याने मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते. नाचणी समाविष्ट असलेल्या जेवणात ग्लायसेमिक प्रतिसाद कमी असतो.

४) त्वचा आणि केस :-
नाचणीमध्ये मेथिओनिन असल्याने बाळाची त्वचा आणि केस निरोगी राहण्यास प्रोत्साहित करते.

या प्रकारे अजूनही बऱ्याच प्रकारे नाचणी बाळाच्या लहान वयामध्ये विविध उपयोगी पडते.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथिक तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button