Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र…चिरतरुण राहण्यासाठी आयुर्वेदीक टिप्स

आरोग्याचा मुलमंत्र…चिरतरुण राहण्यासाठी आयुर्वेदीक टिप्स

आयुर्वेद तुम्हाला शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो. कारण ही तीन क्षेत्रे एकमेकांना जोडलेली आहेत.’ त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित काही महत्त्वाच्या सवयी इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे शेअर केल्या, ज्या प्रत्येकजण निरोगी जीवन जगण्यासाठी स्वीकारू शकतो.

सकाळी उठणे:-

आयुर्वेदानुसार सकाळी सूर्योदयाच्या किमान एक तास आधी लवकर उठले पाहिजे. ही एक चांगली सवय आहे आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करते. आपले वाडवडील नेहमीच ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा मोलाचा सल्ला देतात. ब्रह्म मुहूर्त हा एक शुभ काळ आहे, जो सूर्योदयाच्या 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो आणि त्याच्या 48 मिनिटे आधी संपतो.

नस्य कर्म करा (नाकासाठी आयुर्वेदिक ड्रॉप) :-

तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा तुपाचे यापैकी कोणतेही दोन थेंब नाकात घाला. हे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते, टक्कल पडण्यापासून बचाव करते आणि चांगली व शांत झोप लागण्यास सुद्धा भरपूर मदत करते.

व्यायाम करा :-

सकाळी लवकर व्यायाम केल्याने शरीरातील सुस्ती दूर होते व एक नवी एनर्जी मिळते. हे शरीर रिचार्ज करते आणि दैनंदिन कामकाज करण्यात उत्साह व नवी उमेद जागृत होते. याव्यतिरिक्त व्यायाम शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी अमृतासम ठरतो. यामुळे स्नायू, हाडे लवचिक व मजबूत बनतात. तसंच नियमित व्यायाम केल्याने त्वचा ग्लोइंग राहते आणि लवकर म्हातारपणाच्या खुणा चेह-यावर दिसत नाहीत.

दातांची काळजी :-

कडुनिंबाची ताजी काठी, खदीर (बाभूळ) इत्यादी वापरल्याने दात स्वच्छ होतात आणि तोंडाची दुर्गंधी देखील दूर होते. आताच्या टुथपेस्ट पेक्षा या नैसर्गिक वनस्पतींच्या काट्या अत्यंत औषधी असतात. यामुळे तोंडाचे आजार टळण्यास सुद्धा मदत होते आणि दात अगदी हि-यासारखे चमकतात. शिवाय या औषधी वनस्पतींमुळे हिरड्या सुद्धा मजबूत होतात

स्नान..
आयुर्वेदानुसार नियमित व्यायामानंतर अर्धा ते एक तासा नंतर अवश्य स्नान करावे. यामुळे शरीराला शेक मिळतो, थकलेले शरीर शांत होते, घामाजलेलं अंग स्वच्छ होतं आणि तरतरी येते.

हलका डिनर :-
आयुर्वेदानुसार रात्री 8 च्या आधीच व हलका आहार केला पाहिजे. हे चयापचय घटकांना (metabolism system) रात्री थोडा आराम देण्यास मदत करते. तसंच संध्याकाळी 6 ते 8 ही डिनरची योग्य वेळ आहे, एक हेल्दी आयुष्य जगण्यासाठी डाएटिशियन कायम या वेळेमध्येच डिनर करण्याचा सल्ला देतात.

झोप :-
वातावरण किंवा घरातील परिसर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. दिवसा झोपणे टाळा. रात्री पुरेशी झोप घ्या. योग्य झोप आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते. झोपण्याआधी किमान अर्धा ते एक तास मोबाईल, टीव्ही व लॅपटॉप अशा उपकरणांपासून दूर राहा. रात्री १० वाजता म्हणजेच वेळेत झोपा आणि सकाळी सुर्योद्याच्या आधी उठा. तर मंडळी, या 7 सवयी आपल्याला औषधं आणि डॉक्टर यापासून दूर ठेवतात. हेल्दी आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, स्ट्रेस घेऊ नका, हसत राहा, व्यायाम करा.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Back to top button