India

आरोग्याचा मुलमंत्र…सूर्य नमस्कारातुन आरोग्य साधना

आरोग्याचा मुलमंत्र…सूर्य नमस्कारातुन आरोग्य साधना

सूर्य नमस्कार हा योगाचा सराव सुरू करण्याचा उत्तम मार्ग आहे. 12 आसनांची ही एकात्मिक मालिका आसन पद्धत आहे.
सूर्य ऊर्जाचा सगळ्यात मोठा स्तोत्र आहे. सूर्याच्या किरणे पासूनच आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते.
सूर्य नमस्कार हे खुल्या मोळ्या जागी केले पाहिजे. चटई अंथरून रिकाम्या पोटी याचा अभ्यास करावा.

• आसन व त्याच्या पद्धतींचे फायदे:

१. नमस्कारासन : दोन्ही पावले एकमेकांना जोडलेली हवीत. दोन्ही पाय जोडून घेतल्याने शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते. दोन्ही हात छातीच्या मध्यावर असावेत. हाताचे कोपर आणि मनगट एका सरळ रेषेत यावेत. (या स्थितीमुळे खांदे विस्तारले जाऊन छातीचा पिंजरा रुंदाविण्यास मदत होते.)

२. उर्ध्वहस्तासन : अनेकदा कंबर मागे, छातीचा पिंजरा पुढे आणि हात वर ताणलेल्या स्थितीमध्ये, अशा तीन ठिकाणी शरीराला चुकीच्या पद्धतीने हात वर घेतले जातात. त्यामुळे कमरेवर अनावश्यक ताण येतो. हात वर घेऊन मान गरजेपेक्षा जास्त मागे ताणली जाते. त्यामुळे शरीराचा तोल जाऊ शकतो.

३. उत्तानासन : दोन्ही हातांचे तळवे पायाच्या बाजूला जमिनीवर टेकवणे अपेक्षित आहे.(परंतु गुडघ्याचे स्नायू मोकळे नसल्यामुळे हात टेकत नाहीत. अशा वेळेस पाय गुडघ्यात वाकवून हात जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न होतो). मान आत वळवून गुडघ्यांना कपाळ लावणे आवश्यक आहे. असे केल्यावरच पाठीची आणि गुडघ्याच्या मागच्या स्नायूंची लवचीकता वाढेल.

४. एकपादप्रसरणासन : उत्तानासनात दोन्ही हात जेथे टेकलेले आहेत, तेथून ते पुढे न हलवता पाय मागे नेणे अपेक्षित आहे. (अनेकदा हात पुढे टेकवले जातात, त्यामुळे मांडीवर आणि हिप जॉइंटवर होणारा सकारात्मक परिणाम साधता येत नाही). दोन्ही पाय गुडघ्यात पूर्ण वाकवून टाच जमिनीवर टेकणे अपेक्षित आहे (अनेकदा फक्त चवडा टेकवला जातो आणि टाच वर उचललेली असते). टाच टेकल्याने पायाचा घोटा लवचीक होतो.

५. दंडासन : दोन्ही पाय मागे नेऊन खांदे, कंबर आणि टाच तिरक्या रेषेमध्ये असावेत (अनेकदा कंबर वर उचललेली असते किंवा जमिनीलगत खाली येते). तसे न करता प्लँक पोझिशनमध्ये थांबावे. असे केल्याने मनगट आणि खांदे सशक्त होण्यास मदत मिळते.

६. अष्टांग नमस्कारासन : या स्थितीत हात कोपरात वाकवून छातीचा भाग जमिनीच्या दिशेने खाली आणणे अपेक्षित आहे (परंतु हातात तेवढी ताकद नसल्याने आधी गुडघे टेकून पूर्ण शरीर जमिनीवर टेकवले जाते).

५. दंडासन : दोन्ही पाय मागे नेऊन खांदे, कंबर आणि टाच तिरक्या रेषेमध्ये असावेत (अनेकदा कंबर वर उचललेली असते किंवा जमिनीलगत खाली येते). तसे न करता प्लँक पोझिशनमध्ये थांबावे. असे केल्याने मनगट आणि खांदे सशक्त होण्यास मदत मिळते.

६. अष्टांग नमस्कारासन : या स्थितीत हात कोपरात वाकवून छातीचा भाग जमिनीच्या दिशेने खाली आणणे अपेक्षित आहे (परंतु हातात तेवढी ताकद नसल्याने आधी गुडघे टेकून पूर्ण शरीर जमिनीवर टेकवले जात वाढेल.

७. भुजंगासन : हात कोपरात सरळ करून पूर्ण शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करावा. मान शक्य तेवढी मागे नेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून मानेपासून कमरेपर्यंत पाठीचा कणा मागच्या बाजूला झुकून त्याची लवचीकता वाढेल

८. अधोमुखश्वानासन : हातांच्या मदतीने पाठीचा कणा पायाच्या दिशेने ढकलणे अपेक्षित आहे. त्याद्वारे पायांच्या टाचा जमिनीवर टेकवणे अपेक्षित आहे. असे झाल्यावरच पोटरीचे स्नायू आणि मांडीच्या मागचे स्नायू ताणले जातील व तेथील रक्‍तवाहिन्या मोकळ्या होऊन गुडघे मोकळे होती जाते.

९. एकपादप्रसरणासन : मागचा एक पाय पुढे आणताना पोटाच्या आकारामुळे किंवा मांडीच्या स्नायूंमध्ये लवचीकता कमी असल्यामुळे पाय गुडघ्यात दुमडून पोटाजवळ पटकन येत नाही. अशा वेळेस पाय बाहेरच्या बाजूने गोल फिरून पुढे येतो. दोन्ही हातांच्या मध्ये पाय येणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास चवडा टेकवला जातो आणि टाच उचलली पाहिजेत

१०. उत्तानासन : दुसरा पाय पुढे घेऊन आसन क्रमांक ३ची स्थिती परत एकदा आली पाहिजे. त्यासाठी दोन्ही पाय दोन्ही हातांच्या रेषेत पुढे आणता आले पाहिजेत.

११. ऊर्ध्वहस्तासन : या स्थितीत श्वास घेत दोन्ही हात वर नेताना छातीचा पिंजरा पोटाचे स्नायू ताणत आसनस्थिती घेणे, ज्याद्वारे सूर्यनमस्कार करताना पाठीच्या कण्याला आलेला आकुंचन आणि प्रसरणाचा ताण पूर्णपणे मोकळा होईल. शरीर व्यवस्थित ताणले गेल्यामुळे शरीराला हलकेपणा प्राप्त होईल.

१२. नमस्कारासन : सूर्यनमस्कार इतका पद्धतशीर आणि व्यवस्थित झाला पाहिजे, की शेवटच्या स्थितीला दोन्ही पाय जोडलेल्या स्थितीतच आले पाहिजेत आणि दोन्ही हाताचा नमस्कार छातीच्या मध्यावर आला पाहिजे.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथिक तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button