India

आरोग्याचा मुलमंत्र..कॉफी चे सौंदर्य उपयोग

आरोग्याचा मुलमंत्र..कॉफी चे सौंदर्य उपयोग

ठळक मुद्दे

कॉफीच्या उपयोगाने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार होते.
कॉफीमधील गुणधर्म त्वचेवर अँण्टि एजिंग सारखे काम करतात.
सनस्क्रीन इफेक्टसाठी आणि सुर्याच्या घातक अती नीलकिरणांपासून वाचण्यासाठी एक चमचा कॉफी सनस्क्रीनसारखं काम करते.

1. त्वचेच्या खोलवर स्वच्छतेसाठी कॉफी स्क्रब :-
कॉफीत अँण्टिऑक्सिडण्टस भरपूर प्रमाणात असतात. कॉफीच्या उपयोगाने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार होते. यासाठी कॉफी, साखर, आणि लिंबाचा रस घालून त्याचा घट्टसर लेप करावा. हा लेप चेहेरा, मान आणि शरीरावर इतरत्रही लावता येतो. चेहेर्‍यावर हा लेप लावून तो काही वेळ ठेवावा. त्यानंतर स्क्रब करत ( चेहेरा हळुवात घासत) चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा. कॉफी स्क्रब एकदा वापरला तरी लगेच चेहेर्‍यात फरक दिसून येतो.

2. कॉफीचा अँण्टिएजिंग इफेक्ट :-
कॉफीचा लेप चेहेर्‍यास लावल्यानं त्वचा घट्ट होते. कॉफीमधील गुणधर्म त्वचेवर अँण्टि एजिंग सारखे काम करतात. कॉफीचा हा इफेक्ट मिळवण्यासाठी एक चमचा कॉफी, एक चमचा दही आणि मध घ्यावं. या तिन्ही गोष्टी चांगल्या एकत्र करुन पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेर्‍यावर लावून थोडा वेळ ठेवावी. मग त्वचा स्वच्छ करावी. ही पेस्ट धुण्याआधी थोडा वेळ हलक्या हातानं मसाज करावा. अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा कॉफी पेस्ट लावावी.

3. कॉफीतील सनस्क्रीन गुण :-
सुर्याच्या अतिनील किरणांचा त्रस हा होतोच. यामुळे त्वचेवर काळेपणा , फोड आणि त्वचा खराब होते. कॉफीमधे पॉलिफिनॉल हा घटक असतो. हा घटक त्वचेचं सुर्याच्या हानिकारक किरणांपासून्न वाचण्यासठी होतो. या सनस्क्रीन इफेक्टसाठी आणि सूर्याच्या घातक अती नील किरणांपासून वाचण्यासाठी एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यावा. तो चांगला मिळून घ्यावाही पेस्ट चेहेर्‍यावर पंधरा-वीस मिनिटं राहू द्यावी. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा.

4. कॉफीतील कॅफिन इफेक्ट :-
डोळे कायम सूजल्यासारखे वाटत असेल तर त्याचा उपाय हा कॉफीतही आहे. कॉफीत असलेल्या कॅफिनमुळे शरीर आणि त्वचेत घट्टपणा येतो. यासोबतच डोळ्यांखालची सूज घालवण्यासाठीही कॉफी वापरता येते. यासाठी एक ग्लास गरम पाणी करुन त्यात कॉफी मिसळावी. हे मिश्रण कापसाच्या बोळ्यानं डोळ्यांखाली लावावं.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमीओपॅथी तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button