sawada

मुख्य उद्देश डावलून सावदा अग्निशामक दलाची गाडीचा इतर कामी केला जात आहे सर्रास उपयोग! – मात्र पालिका प्रशासन याबाबत असंवेदनशील

मुख्य उद्देश डावलून सावदा अग्निशामक दलाची गाडीचा इतर कामी केला जात आहे सर्रास उपयोग! – मात्र पालिका प्रशासन याबाबत असंवेदनशील

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा व परिसरात आकस्मिकपणे कुठेही आग लागली असता त्याठिकाणी आग विझविण्यासाठी तातडीची मदत व्हावी म्हणून प्रशासनाने सावदा नगरपरिषदेत दिलेल्या अग्निशामक दलाची गाडीचा सदरील मुख्य उद्देश डावलून इतर कामी सर्रास वापर केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा व परिसरात दुर्दैवाने कुठेही कोणत्याही क्षणी आग लागल्यास त्यात मूल्यवान वस्तू सह जीवितहानी टाळण्यासाठी शासनाने सावदा नगरपरिषदेला दिलेली अग्निशामक दलाची गाडी नेहमी पाण्याने भरून चालक सह अग्निशामक दलाचे कर्मचारी हे अटेंशन भूमिकेत कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असावे. हे शासनाचे मुख्य उद्देश व हेतुला थेट बगल देऊन येथील अग्निशामक दलाची गाडीचा वापर सर्रासपणे इतर ठिकाणी केला जात असून याकडे सावदा नगरपरिषद प्रशासनाकडून थेट जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

याचे बोलके उदाहरण असे की, आज दि.१५/१०/२०२१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सावदा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाची गाडीद्वारे सावदा बस स्थानक धोंण्या करिता सर्रास वापर होताना दिसून आले. यावेळी कर्मचाऱ्यांकडून चौकशी केली असता अग्निशामक दलाची गाडीची सदर कामी रितसर पावती घेतल्याचे येथे सांगण्यात आले. मात्र याच दरम्यान सावदा शहर व परिसरात दुर्दैवाने कुठे आग लागल्याची घटना घडली. तर पालिका प्रशासनाने यासाठी तात्काळ कोणत्या प्रकारची उपाय योजना करून ठेवलेल्या आहेत.? किंवा घटनास्थळी आग विझवणे कामी अग्निशामक दलाची गाडी वेळेवर उपलब्ध न झाल्याने होणारे गंभीर स्वरूपाच्या परिणामास जबाबदार कोण? तसेच अग्निशामक दलाची गाडीचा उपयोग इतर कामी करता येतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तरी या अतिसंवेदनशील विषयाकडे सावदा मुख्याधिकारी किशोर चव्हाण सह थेट जिल्हाधिकारी जळगांव यांनी लक्ष देण्याची गरज आहे.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button