Rawer

खिर्डी ते ऐंनपुर रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य सा.बां विभागाचे दुर्लक्ष..

खिर्डी ते ऐंनपुर रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य सा.बां विभागाचे दुर्लक्ष..

खिर्डी प्रतिनिधी:-प्रविण शेलोडे

खिर्डी ते ऐनपूर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या भागातील गावांना व राज्य मार्गाला जोडणारा एकमेव रस्ता असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर सोसायट्या, शाळा, महाविद्यालये असून या रस्त्याने शालेय विद्यार्थी,शेतकरी,इतर वाहन धारक नेहमी येजा करत असतात तसेच ठिकठिकाणी असलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.ऐन पावसाळ्यात रस्त्याला पुराचे स्वरूप आल्यामुळे विशेषतः दुचाकी धारकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागली. पाण्यामधून वाट काढताना अनेकवेळा अंदाज न आल्यामुळे छोटेमोठे अपघाताला सामोरे जावे लागले या रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्यामुळे पावसाचे पूर्ण पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्त्याला पुराचे स्वरूप येत असते. खरे तर मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती उद्भवलेली असताना देखील संबधित विभागाला अद्यापही जागा झालेला दिसून येत नाही. रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे काम करणे गरजेचे आहे. संबधित अधिकारी एखादी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत का? असा प्रश्न वाहनधारकांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button