India

आरोग्याचा मुलमंत्र…अशी घ्या ठिसूळ हाडांची मजबूत काळजी

आरोग्याचा मुलमंत्र…अशी घ्या ठिसूळ हाडांची मजबूत काळजी

प्रत्येक वर्षामध्ये आपल्या शरीरामध्ये जवळपास दहा टक्के हाडांमधील पेशी या नव्याने तयार होतात. आपली हाडे एकमेकांवर घासल्याने अथवा काही कारणास्तव त्यांची झीज झाल्याने त्या ठिकाणच्या पेशी मृत होऊन त्यांची जागा नवीन पेशींनी घेतलेली असते. ही प्रक्रिया नियमितपणे सुरू असते. हाडांमध्ये तीन प्रकारच्या वेगवेगळ्या पेशी असतात.

या पेशी विघटन झालेल्या हाडांना पूर्ववत करण्यासाठी तेथील मृत पेशींना बाजूला सारून पेशींची नवनिर्मिती करून हाडांची स्थिती सुधारण्याचे कार्य़ करतात. ओस्टिओक्लास्ट (हाडांमधील मोठ्या पेशी), ओस्टिओब्लास्ट (या पेशी नवीन हाड निर्माण करण्यासाठी कार्य़शील असतात) आणि ओस्टिओसिट या तिसऱ्या प्रकारच्या पेशी गरजेनुसार इतर दोन पेशींमध्ये स्वतःचे रूपांतर करून घेत असतात.

• हाडे ठिसूळ होण्याची करणे :-

-कंबर, हात व मनगटांच्या हाडांमध्ये वेदना असणे.

·-मानेमध्ये वेदना, पाठीच्या खालच्या बाजूला वेदना.

-हाडे कमकुवत होणे.

-लहानसहान कारणांमुळे हाडे फ्रॅक्चर होणे.

– औषधांचा दुष्परिणाम
उदा. केमोथेरेपी, स्टीरॉइड चा जास्त वापर.

-अधिकवेळा प्रसूती

-रजोनिवृत्ती

– अति धूम्रपान

हाडे ठीसूळ होण्या पासून टाळण्या साठी काही उपाय…

– सोडीयम फ्लोरॉईड
हा एकमेव घटक आहे हा हाडे विकसित करणाऱ्या पेशींना उत्तेजित करतो.

– कॅल्शियम
हाडांची ताकद वाढवण्या काही कॅल्शियम सर्वात प्रमुख घटक आहे. वयमाना नुसार शरीरात कॅल्शियम बनवण्याची क्रिया कमी होते. म्हणून बाहेरून कॅल्शियम घ्यावे लागते

– व्हिटॅमिन डी
आपण खाल्लेले कॅल्शियम शरीरात शोषण्याचे काम हे डी जीवनसत्व करत असते. आपल्याला हे जीवनसत्व कोवळ्या उन्हातून सुद्धा मिळते.

– नियमित व्यायाम करा
हाडांच्या बळकटी काही डॉक्टरांच्या देखरेखी खाली नियमित व्यायाम आणी योग करावा..
योगा मुळे शरीर लवचिक होते. तसेच व्यायामा मुळे हाडांमध्ये ताकद वाढते.

कितीही झाल तरी डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय कोणतीही औषधी घेऊ नये.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button