Pandharpur

गुंतवणूकदार शेतकऱ्याचे पैसे व्याजासह घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. ऍड. दीपक पवार.

गुंतवणूकदार शेतकऱ्याचे पैसे व्याजासह घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. ऍड. दीपक पवार.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर सीताराम सहकारी साखर कारखान्याकडून सभासद शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यात येत आहे,पण ते पैसे सेबीच्या नियमानुसार १५टक्के व्याजासह परत करण्यात यावेत ,तसेच सर्व गुंतवणूकदारांना व्याजाशिवाय चेक स्वीकारू नये, असे आवाहन सीताराम साखर कारखान्याचे सभासद ऍड दीपक पवार यांनी शुक्रवार दि १८फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी सीताराम कारखान्याचे सभासद शेतकरी उपस्थित होते, ऍड पवार म्हणाले तक्रारीचा फास आवळल्याने कल्याण काळे यांना घरोघरी जाऊन पैसे द्यावे लागत आहेत ,हे आमचे यश
आहे .सुमारे१५०००लोकांकडून ४०ते५०कोटी रुपये जमा केले असताना केवळ ज्या लोकांनी तक्रारी केल्या, त्यांनाच पैसे दिले जात आहेत. तेही फक्त मुद्दल व्याज देत नाहीत तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. कारवाईला घाबरून केवळ तक्रारदारांचे पैसे देण्यात येत आहेत, चंद्रभागा साखर कारखान्याची यादी गेल्या सहा महिन्यांपासून मागत आहे पण ती दिली जात नाही ,केवळ यादी द्यायला हे एवढा त्रास देत असतील तर सीताराम च्या गुंतवणूकदारांचे पैसे कसे देणार असा सवाल ऍड दीपक पवार करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button