Amalner

अवैध देशी विदेशी  दारू वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या..!मुद्देमाल जप्त ..!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

अवैध देशी विदेशी दारू वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या..!मुद्देमाल जप्त ..!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

अमळनेर पो.स्टे. हददीत दि.०१/०८/२०२१ रोजी सकाळी पोलीस निरीक्षक जयपाल
हिरे यांना अमळनेर पोलीस स्टेशनचे अंमलदार सुनिल कौतिक हटकर, दिपक विसावे, हितेश चिंचोरे, भुषण बाविस्कर, राहूल चव्हाण यांचे पथक धुळे रोडवरुन MH-१८-T-७६० तीन चाकी वाहन गैरकायदाची देशी व विदेशी दारु घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकातील अंमलदार यांनी धुळे रोडावर यशस्वीरित्या सापळा लावून MH-१८-T७६० तीन चाकी गाडी थांबवून चेक केली असता त्याच्याकडे पाच बॉक्स देशी व विदेशी दारु गैरकायदाची मिळून आली. त्यास त्याचे नांव विचारले असता नामे प्रविण हिंमत कापडणे, वय-३५ वर्षे, रा. जानवे ता. अमळनेर असे सांगितले, त्याच्या ताब्यात बाजारभाव प्रमाणे देशी व विदेशी दारु
किंमत १३,४१२/- व १ बजाज कंपनीची मिनी डोअर ५५,०००/- किंमत असे एकूण मुददेमाल ६८४१२/- किंमतीचा आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे.

त्यांच्यावर अमळनेर पो.स्टे. प्रो.गुरनं. ३२५/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ चे कलम ६५(अ) व (ई) प्रमाणे गुन्हा दि.०१/०८/२०२१ प्रमाणे दाखल करण्यात आला असून तपास पोना/१११८ अलोक साबळे हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button