Nashik

दिंडोरी तालुक्यातील जानोरीच्या नवरदेवाने लढवली भन्नाट कल्पना कुरकरेच्या पाकीटांने सजवली नवरदेवाची गाडी

दिंडोरी तालुक्यातील जानोरीच्या नवरदेवाने लढवली भन्नाट कल्पना
कुरकरेच्या पाकीटांने सजवली नवरदेवाची गाडी

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

सध्या करोनामुळे शासनाने थोड्या लोकांमध्ये विवाह करण्याचे आदेश दिले आहे. त्याचा एक भाग म्हणून खर्चाला फाटा देवून साध्यापध्दतीने लग्‍न पार पडत आहे. सध्या फुलांना चांगले भाव असल्याने सर्व सामान्य कुटूंबातील नवरदेवाच्या गाडीला फुलांची सजावट करणे शक्य होत नवल्याने नवरदेवाकडून अनोखी शक्कल लढवले जात आहे. असेच जानोरी येथील एका नवरदेवाने अनोखी शक्कल लढवत फुलांच्या ऐवजी कुरकूरे, वेफरच्या पाकीटांने आकर्षक गाडी सजवून सगळ्याचेच लक्ष वेधुन घेतले आहे.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील वसंत सखाराम भसरे यांचे चिरंजीव आकाश व मातोरी ता. नाशिक येथील सुकदेव भडांगे यांची कन्या कविता यांचा विवाह मातोरी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. सध्या करोनाने सर्वसामान्य जनतेचे हाल केले असून खर्च करण्यासाठी पैसे नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. त्याच अवकाळी पाऊस, धुके, थंडी, वादळ, गारपीट आदी संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरीही हैराण झाले आहे. याचा एक भाग म्हणून फुलांना किमंती असल्याने सर्वसामान्य कुटूंबातील नवरदेवाला गाडी सजवण्यासाठी फुलांचा खर्च न परवडणारे आहे. त्यामुळे जानोरी येथील आकाश वसंत भसरे या नवरदेवाने नवीन शक्कल लढवून आपले वाहन सजविण्यासाठी चक्क कुरकुरे, वेफरची पाकीटांची माळ लावली. त्यामुळे सर्वांचे लक्ष या वाहनाने वेधुन घेतले होते. 20 फुलांचा बंडल 400 रुपयांना मिळतो. त्यामुळे पूर्ण गाडी सजविण्यासाठी सुमारे 9 ते 10 हजार रुपये लागतात आणि दुसर्‍या दिवशी हे फुले फेकून द्यावे लागतात. त्यामुळे पैसे वाया घालवण्याऐवजी कुरकुरे, वेफरची पाकीटांची माळांनी गाडी सजवली आहे. कुरकुरे, वेफर हे उपयोगात येणार आहे. त्यामुळे नवरदेवाने एक नवीन शक्कल लढवली आहे. या नवरदेवाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.

सध्या सर्वत्र बाजारपेठेमध्ये फुलांना मागणी आहे परंतू गेल्या काही दिवसांपासून या फुलांचे भाव वाढल्याने लग्‍नांमध्ये होणारा खर्च याशिवाय फुलांचा खर्च सर्व साधारण कुटूंबाना न परवडणारा आहे. त्यामुळे हौशेला मौल नाही. यानुसार आमच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली. त्या अनुषंगाने आम्ही फुलांऐवजी कुरकूरे, वेफर्सच्या पाकीटाने एक आगळा वेगळा संदेश नागरिकांमध्ये रुजला जावा, या उद्देशाने कुरकूरे, वेफर्सच्या पाकीटाने ही नवरदेवाची गाडी सजवण्यात आली आहे.
*वसंत भसरे, नवरदेवाचे वडील*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button