Bollywood

बॉलिवूडचे धाबे दणाणून टाकणारा हा एनसीबीचा अधिकारी समीर आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा……

बॉलिवूडचे धाबे दणाणून टाकणारा हा एनसीबीचा अधिकारी समीर आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा……

मुंबई

अभिनेता सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यू ला आता वेगळे वळण लागले आहे. यात ड्रग्ज लिंक समोर आली आहे.आणि हा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी टीम कडे देण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारने एनसीबीकडे एक अतिशय कर्तव्यदक्ष ट्रॅक आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना पाठविण्यात आले आहे. ह्या अधिकाऱ्यामुळे बॉलिवूडमधील बर्‍याच लोकांचा रक्तदाब वाढू शकतो.

समीर वानखेडे..कोण?

समीर वानखेडे महाराष्ट्राचा रहिवासी असून 2008 बॅचचा आयआरएस अधिकारी आहे. भारतीय महसूल सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहा आयुक्त म्हणून झाली होती. त्यांच्या उत्कृष्ठ कार्या मुळे त्यांना आंध्र प्रदेश,दिल्लीला पाठवण्यात आले होते.ड्रग्स आणि ड्रग्ज संदर्भात ते तज्ञ मानले जातात. समीर वानखेडेच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षांत साधारणपणे 17 हजार कोटींच्या ड्रग अँड ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. अगदी अलीकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये बदली झाली आहे.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर चा समीर वानखेडे पती आहेत.

आणि आता ह्या दबंग अधिकाऱ्याची नियुक्ती बॉलिवूड शी संबधित असलेल्या ड्रग्स आणि ड्रग्ज च्या वादातीत प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.कालच ह्या अधिकाऱ्याने मुंबईतील रिया चक्रवर्ती च्या घरी झाडा झडती घेतली आहे आणि तपासाला सुरुवात केली आहे. समीर वानखेडे हे अत्यन्त कर्तव्यदक्ष अधिकारी असून डिजी डिस्क पुरस्काराने सन्मानित आहेत.

बॉलिवूडचे धाबे दणाणून टाकणारा हा एनसीबीचा अधिकारी समीर आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा......

बॉलिवूड तणावात…

अश्या या दबंग आयपीएस समीर वानखेडेच्या प्रवेशामुळे बॉलिवूड प्रचंड तणावात आहे. बॉलिवूडमध्ये अनेक ड्रग्ज घेतात आणि मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात त्यांच्या पाया खालची जमीन सरकली आहे.बॉलिवूड मधील ड्रग्ज चा व्यापार आणि उपयोग या तापासामुळे पुढे येणार आहे आणि मोठी साफ सफाई मोहीम एनसीबी राबवेल अशी आशा निर्माण झाली आहे.

काय होत आहे कार्यवाही…

एनसीबीने आतापर्यंत काही छोट्या ड्रग सप्लायर्स ला अटक केली आहे.यातून अनेक मोठे डीलर्स जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे. आहे. छोट्या धाग्यांच्या माध्यमातून मोठया डीलर्स पर्यंत एनसीबी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.यात बरीच मोठ्या नावांची यादी उजेडात येणार आहे. याआधीही बॉलिवूड मधील अनेक मोठी नावं ड्रग्ज संदर्भात प्रकाशात आली होती. परंतु पैसा,गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप इ मुळे ही नावे पुढे कचऱ्याच्या पेटीत टाकल्या प्रमाणे फुरर होतात..कार्यवाहीचा ताल तपास लागत नाही….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button