Amalner

उंच गगनी तिरंगा तर फडकला..!पण इकडे जोशीपुरा तुंबला.. नगरपालिका,ठेकेदाराचे दुर्लक्ष

उंच गगनी तिरंगा तर फडकला..!पण इकडे जोशीपुरा तुंबला, नगरपालिका,ठेकेदाराचे दुर्लक्ष

रस्त्याचे काम सुरू.. गटारीचे पाईप टाकले लहान..

अमळनेर येथील प्रभाग 8 मधील जोशीपुरा परिसर पावसाच्या पाण्याने तुंबला आहे. गटारीमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य धोक्याबाबत परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेला पुर्वसूचना दिलेली होती. तरीही पालिकेच्या वतीने अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे जोशीपुरावासीयांचा रोष उफाळला आहे.

जोशीपुरा तील रहिवासी यांनी नगरपरिषदेला 3 ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते. त्या निवेदनात म्हटले होते, की परिसरात गटार असून अल्प पाऊस जरी झाला तरीही ती तुडूंब भरते गटारीतील मैलापाण्यामुळे परिसर तुंबतो व हे घाण पाणी थेट काही घरातही घुसते. हे पाणी उतरेपर्यंत घराबाहेर ये-जा करता येत नाही. दुर्गंधीयुक्त पाण्यासोबतच केरकचरा, साप, बेडूक व इतर जलचर प्राणीही शिरकाव करतात. त्यामुळे परिसरवासीयांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न तर निर्माण झाला असून जनावरांमुळे जीवितास धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या कायमची निकाली काढावी अशी विनंती करण्यात आली होती.

दरम्यान, या परिसरात 3 वर्षांपूर्वी नविन रस्ता तयार करण्यात आला होता. हा रस्ता तयार करताना गटार रस्त्याच्या खालून करण्यात आलेली असून गटारीचे पाणी जाण्यासाठी अतिशय लहान पाइप टाकण्यात आला आहे. हे काम सुरू असताना या परिसरातील नागरिकांनी संबंधित ठेकेदारास गटारीसाठी मोठा पाईप टाकावा अशी विनंती केली होती. मात्र ठेकेदाराने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न सोडवावा अशी विनंती परिसरवासीयांनी नगरपालिकेकडे केली होती. मात्र, नगरपालिकेनेही या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने जोशीपूरा तुंबला आहे. हा प्रश्‍न युद्धपातळीवर दूर सारण्याची गरज आहे.

आणि आता पुन्हा परवाच्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.अमळनेर नगरपरिषदेच्या पाठपुराव्याने कारंजा चौकात नुकताच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी 105 फुटावर अभिमानाने तिरंगा फडकला आहे.निश्चितच ही बाब गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे.पण तितकेच महत्वपुर्ण आहे सामान्य नागरिकांचे प्रश्न,त्यांच्या समस्या..त्या देखील तितक्याच तत्परतेने सोडविल्या गेल्या पाहिजेत की जेणे करून त्यांचे आरोग्य,रोजचे जीवनमान सुकर होईल.3 वर्षांपासून चा हा प्रलंबित प्रश्न प। याकडे लक्ष देण्यास न प अध्यक्षा, अधिकारी यांना वेळ नाही मात्र 105 फुटावर तिरंगा कसा फडकेल या गोष्टीचा पाठपुरावा मात्र जोरात करून तिथे अधिक वेळ व प्रॉयारिटी दिली जाते अश्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित लेख

Back to top button