Pandharpur

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वेरीतील शिक्षकांचे परिश्रम अनमोल शास्त्रज्ञ डॉ. यल्लोजीराव मिरजकर डॉ. मिरजकर यांची स्वेरीला सदिच्छा भेट

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वेरीतील शिक्षकांचे परिश्रम अनमोल
शास्त्रज्ञ डॉ. यल्लोजीराव मिरजकर डॉ. मिरजकर यांची स्वेरीला सदिच्छा भेट

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर: ‘विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून उत्तम करिअर घडविण्यासाठी स्वेरी ज्या प्रकारचे शिक्षण देते ती खरोखरच उल्लेखनीय बाब आहे. राज्यातील शिक्षण संस्थांनी स्वेरीचे अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला नक्कीच अधिक गती येईल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्हणून स्थापन झालेल्या स्वेरीत आज ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थी देखील समरस होतात हे एक भविष्याच्या दृष्टीने प्रगतीचे पाऊल आहे. स्वेरी कॅम्पसकडे पाहिल्यास शिक्षक वर्ग हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने परिश्रम घेत असल्याचे दिसून येते आणि याच कारणामुळेच ‘स्वेरी’चे नाव शिक्षणक्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते.’ असे प्रतिपादन न्यु जर्सी (युएसए) मधील शास्त्रज्ञ डॉ. यल्लोजीराव मिरजकर यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला कोलगेट पामोलीव्ह कंपनीतील ग्लोबल विभागात रिसर्च अँड डेव्हलपमेंट अधिकारी म्हणून निवृत्त झालेले न्यु जर्सी (युएसए) स्थित शास्त्रज्ञ डॉ. यल्लोजीराव मिरजकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी शास्त्रज्ञ डॉ. मिरजकर यांनी स्वेरीतील शैक्षणिक व्यवस्था व सुविधा पाहून गौरवोद्गार काढले. प्रारंभी स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी त्यांचे स्वागत केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर आणि त्यांच्या १६ अभियंत्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘स्वेरी’ ची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल, शैक्षणिक कार्यपद्धती, स्वेरीला मिळालेली मानांकने, संशोधनासाठी आलेला निधी आदी बाबींची माहिती संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे यांनी दिली. पुढे बोलताना शास्त्रज्ञ डॉ. मिरजकर म्हणाले की, ‘गोव्यातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने पंढरपूरला भेट देण्याचा योग आला. यापूर्वी संशोधनाच्या प्रगतीमुळे आणि शिक्षणातील नवनवीन उपक्रमांमुळे ‘स्वेरी’चे नाव ऐकून होतो, आता प्रत्यक्षात पाहता आले. स्वेरीमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांची चर्चा होत असताना जवळून पाहिले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचा अंदाज आला. स्वेरीमध्ये ‘आदर व संस्कार’ या बाबी ठळकपणे जाणवतात. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी केले जाणारे शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न व तळमळ वाखाणण्यासारखी आहे.’ यावेळी शास्त्रज्ञ डॉ. मिरजकर यांनी प्रवेश प्रक्रिया विभाग, वर्कशॉप, संशोधन विभागासह अन्य विभाग, फार्मसी महाविद्यालयाकडे असणाऱ्या ‘हर्बल गार्डन’ला भेट देवून तेथील विविध प्रकारच्या आणि दुर्मिळ असणाऱ्या औषधी वनस्पतींची पाहणी करून माहिती जाणून घेतली. स्वेरी अंतर्गत असलेली चारही प्रमुख महाविद्यालयामधील प्राध्यापकांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वेरीच्या संशोधन विभाग अंतर्गत असलेल्या रोपळे गावातील ‘आकृती’ प्रकल्पाला भेट दिली. तेथे परमेश्वर माळी यांनी आकृतीच्या गरुडझेपेबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संगीता मिरजकर यांच्यासह डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, प्रा. भास्कर गायकवाड, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, प्रवेश घेण्यासाठी आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button