Pandharpur

तर पालकमंत्री भरणेमामा ना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही.माऊली भाऊ हळणवर

तर पालकमंत्री भरणेमामा ना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही.माऊली भाऊ हळणवर

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर उजनी धरणातुन इंदापूर तालुक्याला प्रस्तावित केलेल ५ TMC रद्द करा अन्यथा पालकमंत्री भरणेमामानां सोलापूर जिल्ह्यात फिरणे मुस्किल करु असे भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव माऊली भाऊ हळणवर म्हणाले की
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर जमिनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या अनेक धरणग्रस्ताची ची गावे पंढरपूर व इतर तालुक्यात पुनर्वसीत झाली आहे त्याचा पहिला हक्क या पाण्यावर आहे मुळे व सोलापूर सह अनेक शहर व गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या धरणावर अवलंबून आहेत त्यातच मराठवाड्याला पण पाणी जानार आहे त्या योजना पुर्नत्वाच्या मार्गावर आहेत सद्या लाभक्षेत्रातील शेतकर्याच्या पिकांना पाणी मिळत नाही हे पाणी गेल तर संपूर्ण सोलापूर जिल्हा राजस्थानच्या वाळवंटासारखा ओसाड होईल गेल्याच आठवड्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी च्या नेते व उपमुख्यमंत्री व अनेक मंत्र्यानी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या पाणी योजनेला उजनी तुन पाणी देणार असे आश्वासन देवु मते मागितली होते हि मंगळवेढ्यातील जनतेची फसवणुक च आहे आता पंरतु रातोरात जलसंपदा विभागाने एक आदेश काढुन टाकाऊ साडंपाणी धरणात येत आसल्याच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्याचे हक्काचे पाणी चोरण्याचे महा पाप केले आहे जेव्हा जेव्हा राज्यात राष्ट्रवादी ची सत्ता येते तेव्हा तेव्हा असाच अन्याय केला जातो निराभाटगरचे पण पाणी अस्याच प्रकारे बारामती ला गेले त्याच प्रमाणे उजनीचे पाणी इंदापूर तालुक्याला गेले तर सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या प्रश्न गंभीर होणार आहे आगोदरच कोरोणा मुळे शेतकर्याच जिवन जगने अवघड झाले आसताना वरून हे संकट ओढावलेले आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या गर्ततेत अडकणार आहे स्वतः ला शेतकर्याचा तारणहार जाणता राजा समजनारे राष्ट्रवादी चे वरिष्ठं नेते लक्ष घालतिल असे वाटत नाही शेतकर्याच्या तरुण पोरानी उजनी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे झाले आहे जलसंपदा खात्याने हा आदेश तातडीने मागे घ्यावा अन्यथा शेतकर्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल व पाणी चोरण्याचे महापाप करणार्या पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात फिरु देणार नाहीअसा इशारा भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव माऊली हळणवर यांनी दिला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button