Buldhana

जिजाऊ सृष्टीवर दिव्या फाउंडेशनच्या कार्याचा गौरव

जिजाऊ सृष्टीवर दिव्या फाउंडेशनच्या कार्याचा गौरव

राजेश सोनुने

बुलडाणा : वंचितांसाठी अनेक अडथळ्यांचे दिव्य पार करीत समाजिक क्षेत्रात अतूलनीय कामगीरी बजावणाऱ्या दिव्या फाउंडेशन या संस्थेला मराठा सेवा संघाने, सन्मानित केले आहे. जिजाऊसृष्टीवर माँ जिजाऊ यांच्या ऐतिहासीक जन्मोत्सवात १२ जानेवारीला विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान कार्याची दखल घेतल्यामूळे खऱ्या अर्थाने माँ जिजाऊंचे आर्शिवाद लाभल्याची भावना अशोक काकडे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केली.

समाजातील वंचित, उपेक्षित आणि गोरगरिबांसाठी शासकीय पातळीवर अनेक योजना राबवल्या जातात हे खरे आहे, परंतु यासोबतच समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून या कामी सहकार्य करणारी दिव्या फाऊंडेशन ही सामाजिक संस्थांही खूप महत्त्वाची ठरत आहे. देशभरात अशा अनेक संस्था आहेत. त्यांना आर्थिक मदत करणारे दानदातेही खूप आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी पैसा हाच घटक महत्त्वाचा नाही. या संस्थांना प्रत्यक्ष राबणारे हातही हवे आहेत. दिव्या फाउंडेशनच्या माध्यमातून निराश्रीत, अनाथ, अपंग, मतिमंद, बेघर बेसहारा,गोर गरीब मनोरुग्णांच्या सेवेत अनेक उपक्रम राबविण्यासाठी शेकडो हात राज्यभरात राबत आहेत. त्या मध्ये गोदिया नागपूर मुंबई, पुणे नाशिक औरंगाबाद आशा अनेक मोठ्या शहरांमध्ये काम करत असते दिव्या फाऊंडेशन या समाजकार्याची दखल घेत या संस्थेला माँ जिजाऊ सृष्टीवर सन्मानित करण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे राज्यातील पदाधिकारी मान्यवर, व दिव्या फाऊंडेशनचे सुनील तिजारे, गजानन अवसमोर,ज्योती गवई, निलेश शिंदे,कोकिळा तोमर,राजेन्द्र मोरे ,चंचल भोपळे,पृथ्वीराज चव्हाण,चंद्रकुमार बहेकर,संध्या फुंडे, यादी दिव्या फाऊंडेशन सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button