Nashik

दिंडोरी तालुक्यातील कोरोना रुग्णाचा परिसर सील आरोग्य विभाग कडून संपर्कातील नातेवाईकाचे नमुने तपासणी साठी रवाना

दिंडोरी तालुक्यातील कोरोना रुग्णाचा परिसर सील आरोग्य विभाग कडून संपर्कातील नातेवाईकाचे नमुने तपासणी साठी रवाना

सुनील घुमरे

नाशिक जिल्या तील दिंडोरी तालुक्यातील एकूण तीन संशयित कोरोनो रुग्णांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार वर पोहचली असलयात इंदोरे येथील रुग्णांच्या संपर्कातील 25 व 18 वर्षीय दोन तर येथील 40 वर्षाचे एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे .काल नऊ मे ला इंदोरे येथील रुग्णाच्या संपर्कातील 17 संशयितांचे नमुने तपासणीस पाठवले होते त्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.तालुक्यातील रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली असून नवीन रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेत त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे.निळवंडी येथेप्रांताधिकारी डॉ संदीप आहेर,तहसीलदार कैलास पवार तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे ,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ विलास पाटील आदींसह वैद्यकीय पथकाने भेट देत उपाययोजना सुरू केल्या आहे.निळवंडी येथील रुग्ण हा जिल्हा रुग्णालयात इतर आजारावर उपचार घेण्यासाठी गेला होता त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाचे निदान झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत त्यांना विलीगिकरन कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याचे राहत्या घरापासून 1 किलो मीटर परिसर कँटोमेन्ट झोन व 2 किमी परिसर बफर झोन घोषित करण्यात येऊन सर्वेक्षण आरोग्य तपासणी आदी उपाययोजना करण्यात येत आहे आहे.नागरिकांना सोसियल डिस्टन्स पाळत, मास्क किंवा रुमालाचा नियमित वापर करत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पदावर स्वतःची काळजी घेत सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button