Pandharpur

पंढरपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य पार पाडणारे अधिकारी विलास पवळे होय…….

पंढरपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य पार पाडणारे अधिकारी विलास पवळे होय…….

रफिक अत्तर पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही दिवसातच पंढरपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला अशावेळी प्रसंगावधान राखून आपले कर्तव्य बजावणारे वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांनी नागरिकात असलेली बिबट्याची दहशत कमी केली. काही ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे होते तर काही ठिकाणी बिबट्या सदृश्य पायाचे ठसे दिसत असले तरी हे बिबट्याचे पायाचे ठसे नाही हे ठामपणे सांगणारे अधिकारी होय त्यांनी नागरिकांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले त्याचबरोबर पंढरपुरात वैभव ठरलेले तुळशीवृंदावन देखील याच अधिकार्याच्या अधिपत्याखाली पूर्ण झाले आज तुळशी वृंदावन म्हणजे तरूणाईचा सेल्फी पॉइंट झाला आहे. या ठिकाणी असलेले विविध प्रजातीची तुळस विविध प्रकारचे फुलांची झाडे भिंतीवर रेखाटलेली संतमहिमा आणि सर्व पंढरपूर करांसहीत पंढरीत येणाऱ्या भाविकांना आकर्षित करणारी विठ्ठलाची मूर्ती होय. याच अधिकाऱ्यांच्या कार्यकीर्दि मध्ये कासेगाव रोड येथे वन परिक्षेत्राचे स्वतंत्र कार्यालय नूतन इमारतीत सुरू करण्यात आले. त्याठिकाणी रेस्ट हाऊस व कॉन्फरन्स हॉल ची ही निर्मिती करण्यात आली हे सर्व करत असताना आपल्या सहकार्याची कर्मचाऱ्यांची सलोख्याने वागून त्यांचे प्रेम आत्मसात करून त्यांच्याकडून अनेक कामे करवून घेणारे अधिकारी म्हणजेच विलास पवळे हे होय कार्यालयाच्या ठिकाणी कामासाठी सतत अग्रेसर राहून कर्तव्य बजावणारे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. नुकतीच त्यांची सामाजिक वनीकरण इंदापूर सामाजिक वनीकरण विभाग पुणे येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बदली झाली. पंढरपूर सारख्या ठिकाणी केलेली कामे सहकारी कर्मचाऱ्यांचे लाभलेले सहकार्य आणि पार पाडलेले कर्तव्य या सर्व आठवणी सांगताना त्यांचे डोळे तर पाणवले होते परंतु उपस्थितांचेही डोळे पाणावले अशा कार्यकर्तुत्व अधिकारी यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला यावेळी पंढरपूर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कु.चैत्राली वाघ यांनी पदभार स्वीकारला सर्वांनी त्यांचे स्वागत केले पंढरपूर सह, सोलापूर जिल्ह्यातील विविध अधिकारी कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी घेण्यात आला या प्रसंगी धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक सोलापूर, बाबा हाके, सहाय्यक वनसंरक्षक (कँपा)सोलापूर, वनविभाग सोलापूर यांचे उपस्थितीत विलास पवळे वनपरिक्षेत्र अधिकारी पंढरपूर, इर्शाद शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस, श्रीमती जयश्री पवार वनपरिक्षेत्र अधिकारी मोहोळ यांचा निरोपसमारभ घेण्यात आला. त्याप्रसंगी विजय बाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, नवीन रुजू झालेले कु.चैत्राली वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी पंढरपूर,कोकरे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button