Chalisgaon

चाळीसगाव येथे ८ नोव्हेंबर २०२० रोजी होणार पहिले राज्यस्तरीय जल संमेलन : कोअर कमेटीची झाली स्थापना

चाळीसगाव येथे ८ नोव्हेंबर २०२० रोजी होणार पहिले राज्यस्तरीय जल संमेलन : कोअर कमेटीची झाली स्थापना

चाळीसगाव : येथे शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान, सहज जलबोध अभियानांतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण व गुणवंतभाऊ सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली व भूजलतंज्ञ उपेंद्र दादा धोंडे यांचे प्रेरणेने दि.८ नोव्हेंबर २०२० रविवार रोजी पहिल्या राज्यस्तरीय जल संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन अविस्मरणीय, आगळे वेगळे असे व्हावे यासाठी विविध कार्यक्रम,मान्यवर जलतंज्ञाचे मार्गदर्शन,मोठ्या संख्येने जलमित्रांची उपस्थिती राहणार आहे. याचा एक भाग म्हणून तालुक्यातील या क्षेत्रातील व राजकीय,सामाजिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तींची एक कोअर कमेटीची स्थापना करण्यात आली आहे. या कोअर कमेटीत रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, आडगाव चे सरपंच रावसाहेब पाटील, चैतन्य नगरचे दिनकर राठोड,ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ माळी,वाघळीचे हेमंत मालपुरे,लोंजे येथील डाँ.संदिप राठोड,कळमडूचे दयाराम सोनवणे यांचा समावेश आहे. या कोअर कमेटीची बैठक आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कार्यालयात संपन्न झाली. यावेळी आठ तारखेला होत असणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय जलसंमेलनाबाबत तांत्रिक टिमचे प्रमुख विजय कोळीसर,राहूल राठोडसर व सहकार्यानी नियोजनाबाबत माहिती दिली.जल संमेलन अविस्मरणीय असे करण्याचा माणस कोअर कमिटीने व्यक्त केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button