Chopda

वरगाव्हण जि. प. शाळेला संगणक आणी प्रोजेक्टर भेट पुण्याच्या बेन्टली कंपनीचा उपक्रम…

वरगाव्हण जि. प. शाळेला संगणक आणी प्रोजेक्टर भेट पुण्याच्या बेन्टली कंपनीचा उपक्रम…

Chopda : धानोरा ता. चोपडा (वार्ताहर) येथुन जवळच असलेल्या चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला बेन्टली सिस्टीम इंडिया प्रा. लि. पुणे यांच्यातर्फे संगणक संचालन व प्रोजेक्टर भेट देण्यात आला. यावेळी पुणे येथील इंद्रायणी सर्वीसेसचे संचालक महेंद्र पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील जि.प शाळा अथवा खेडे गावाचा विकास करायचा असेल तर विविध समाजातील दानशुर दात्यांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे असुन त्यावरच गावाचे उज्वल असे भविष्य अवलंबुन असणार आहे .

त्याप्रसंगी कंपनीचे सद्स्य श्री. समाधान बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. बोरसे यांच्या मार्गदर्शनाने शाळेला हे डिजिटल साहित्य प्राप्त झाले. या प्रसंगी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीम.गाजरे कमळगाव शाळेचे मुख्याध्यापक समाधान सर व अर्चना मॅडम, शा. व्य.स.च्या अध्यक्षा हसिना तडवी, सदस्य पुणे येथील इंद्रायणी सर्वीसेसचे संचालक महेंद्रभाऊ पाटील ,जहांगीर तडवी, शिक्षण प्रेमी श्री. गजानन पाटील, शाळेच्या मुख्याध्यापक श्रीम.मंगला पाटील, सह शिक्षक श्रीम. आशा सोनवणे, श्री. राकेश पाटील, श्री.शरिफ तडवी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन मंगला पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button