Ahamdanagar

श्रीक्षेत्र मढीच्या कानिफनाथ गडावर महाराष्ट्रातील पहिली होळी पेटली?

श्रीक्षेत्र मढीच्या कानिफनाथ गडावर महाराष्ट्रातील पहिली होळी पेटली..

अहमदनगर प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढीच्या कानिफनाथ गडावर महाराष्ट्रातील पहीली होळी पेटवून कानिफनाथ यात्रा महोत्सवास सुरुवात झाली.गावात भट्टीचा सन साजरा करण्यात आला.प्रत्येक घरातून होळीला पुरणपोळीचा नैवद्य दाखवून रात्री ९ वाजता कानिफनाथांची आरती झाल्या नंतर संपूर्ण गावातील जमा झालेल्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या गोल पद्धतीने रचून कान्होबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे,शामराव मरकड, भाउसाहेब मरकड, बाबासाहेब मरकड यांच्या उपस्थितीत विधीवत पुजा करून वाद्यांच्या गजरात पेटवन्यात आल्या.पोलीस मीत्र संघटनेच्या नेत्या रेषमा चांडक यांच्या नेतृत्वाखालील तेरा सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून गडावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button