Dewala

एप्रिल २०२१ मधील दहावी (S.S.C.) शालांत परीक्षेच्या प्रथम पाच विद्यार्थिनींचा गुण गौरव सोहळा …..

एप्रिल २०२१ मधील दहावी (S.S.C.) शालांत परीक्षेच्या प्रथम पाच विद्यार्थिनींचा गुण गौरव सोहळा …..


देवळा : देवळा एज्युकेशन सोसायटी,संचालित,जिजामाता कन्या विद्यालय,देवळा येथे आज दि.२९जुलै,२०२१,एप्रिल- २०२१ दहावी चे प्रथम पाच विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. आयोजनाचा हेतू विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. ठोके एस.टी.सर यांनी प्रास्ताविकामध्ये सविस्तर स्पष्ट केला. प्रथम पाच विद्यार्थिनी -प्रथम – वैष्णवी निकम व सृष्टी शिंदे, द्वितीय -नैनिका जाधव, तृतीय – प्रांजल थोरात व मानसी जगताप, चार -स्नेहल पाटील व पाच – पायल पगार .
तसेच गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या कु.नैनिका जाधव,कु.अनुष्का गुंजाळ व या सर्व विद्यार्थिनींना गणित विषयाचे मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.पंकज जाधव सर यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.या विद्यार्थिनींचा व पालकांचा गुणगौरव,सत्कार देवळा ऐज्युकेशन सोसायटी चेअरमन व प्राचार्य मा. हितेंद्र आहेर(बापूसाहेब), सेक्रेटरी मा. गंगाधर मामा शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बापुसाहेबांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस प्रेरणा दिली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मोरे आर.ए.यांनी विद्यार्थिनींना काव्यमय मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थिनींचे आईवडिल, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.आहेर एस. एन्. यांनी तर आभर प्रदर्शन श्री. बत्तीसे जे.टी.यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button