Parola

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत सण साजरे करावेत..उपविभागीय अधिकारी राकेश जाधव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत सण साजरे करावेत..उपविभागीय अधिकारी राकेश जाधव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी व पूर्वानुभव लक्षात घेता तिसरी लाट आल्यास भयावह चित्र बघावयास मिळेल हे टाळण्यासाठी खबरदारी म्हणून गणेश उत्सवाच्या काळात शासनाच्या नियमाची अंमलबजावणी करीत कोरोनाचे काटेकोरपणे नियमाचे पालन करून उत्सव उत्साहात साजरा करा त्याच बरोबर एक गांव एक गणपती हि संकल्पना राबवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी केले .

येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीत ते बोलत होते .सदर बैठकीस पोलिस निरीक्षक संतोष भंडारे , गटविकास अधिकारी विजय लोंढे , नगरपालिका कार्यालयीन अधिक्षक संघमित्रा संदानशिव उपस्थित होते.

पोलिस अधिकारी राकेश जाधव पुढे म्हणाले की, गणेश उत्सव काळात कोरोना सह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक भान ठेवून गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी जोपासावेत शासनाने व पोलीस विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गणेश मंडळांना आवश्यक असल्याचे सांगितले तर पारोळा पोलीस निरीक्षक संतोष भंडारे म्हणाले की, गणेश उत्सव हा आपला सण असून तो उत्साहात साजरा करावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button