Amalner

जिल्हाधिकाऱ्यांची संमती मिळताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम यांची ग्वाही

जिल्हाधिकाऱ्यांची संमती मिळताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार

खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम यांची ग्वाही

अमळनेर

येथील खानदेश शिक्षण मंडळाची निवडणूक लावण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून संमती पत्र मिळताच त्याच दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार अशी ग्वाही खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम यांनी दिली आहे. श्री. कदम यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यकारणीची मुदत 8 एप्रिल 2021 ला संपली आहे याची मला पूर्ण जाणीव होती आहे व राहील. मी मुदतीतच निवडणूक घेण्यासाठी तयार होतो. मात्र त्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा उफाळलेला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक लावल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती पत्राद्वारे संस्थेच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने निवडणूक लावू देण्याची परवानगी मागितली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली होती.
यावरून हे सिद्ध होते की मला मुदतीतच संस्थेची निवडणूक घ्यावयाची होती. मात्र तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी न दिल्याने माझा नाईलाज झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे 6 सप्टेंबरला पत्राद्वारे निवडणूक लावू देण्याची परवानगी मागितली. त्या पत्राला उत्तर म्हणून जिल्हाधिकारी यांनी संस्थेच्या सभासदांची संख्या व निवासाची राज्य ,जिल्हा व गावे याची आमच्याकडून माहिती मागवली. सदर माहिती लिखित स्वरूपात आम्ही तातडीने जिल्हाधिकारी यांना पाठवली. या माहितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून यावयाच्या संमती पत्राच्या मी प्रतीक्षेत आहे. संमती पत्र येताच मी एक दिवसाचाही विलंब न करता त्याच दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम लावेल. दरम्यानच्या काळात मी व संस्थेच्या चिटणीसांनी वृत्तपत्रांना जाहिराती देऊन मतदार यादीतील नमूद नावे व पत्त्या बाबत काही बदल असल्यास त्याबाबत संस्थेला त्वरित करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संचालकांची निवडणूक लावण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेतली होती. त्याचे मी रीतसर प्रोसिडींगही केलेले आहे. त्यावर सर्वांच्या सह्या आहेत. तसेच या बैठकीत सर्व पदाधिकारी व संचालकांनी केव्हाही निवडणूक लावल्यास त्यासाठी कोणतीही हरकत नसल्याचे कबूल केले आहे .शिवाय निवडणुकीच्या सर्व प्रक्रियांसाठी जाणकार कर्मचाऱ्यांना ‘ तयार ‘ ठेवण्यासंदर्भात चिटणीसांना मी सूचित केले आहे
सदरचे मुद्दे हे निवडणूक निवडणूक लावण्याच्या प्रक्रियेचेच भाग आहेत. वरील मुद्द्यांवरून हे सिद्ध होते की निवडणूक लावण्यासंदर्भात माझी मानसिकता आधीपासूनच सकारात्मक होती ,आहे व राहील , असेही श्री. कदम यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button