Pandharpur

अभिजीत पाटील यांनी केला देशात पहिला ऑक्सिजनचा प्रकल्प उभा (उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यामध्ये केली ऑक्सिजनची निर्मीती)

अभिजीत पाटील यांनी केला देशात पहिला ऑक्सिजनचा प्रकल्प उभा (उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यामध्ये केली ऑक्सिजनची निर्मीती)
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी असून ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढत खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी केलेल्या आवाहानाला उत्फुर्द प्रतिसाद देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरिंग पुणे याच्या तांत्रिक साहय्याने ऑक्सिजन निर्मिती करण्याचे धाडस दाखवून रात्र-दिवस काम सुरू ठेऊन अठरा दिवसातच प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आले. त्यामध्ये उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी, यांच्यासह सहकार्याने या प्रकल्पात मदतीचा हातभार लावला आणि हा प्रकल्प पुर्णतः करण्यात आला.
धाराशिव साखर कारखान्यात प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मितीस आज प्रारंभ झाला असुन ऑक्सिजनची शुद्धता तपासणासाठी मुंबई च्या लॅब मधे तीन बबल पाठविण्यात आल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले. अगदी कमी कालावधीत ऑक्सिजन निर्मिती करुन धाराशिव साखर कारखान्याने साखर कारखानदारीत प्रेरणा घेणारा आर्दश निर्माण केला आहे. धाराशिव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात काही बदल करून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला पायलट प्रकल्प कार्यान्वित केला आहे आहे. त्यामध्ये ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के आली असुन शासन स्तरावर शुध्दता तपासणीसाठी ऑक्सिजनचे तीन बबल मुंबई येथील लॅब कडे पाठविण्यात आल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.कोरोना संकटापासुन लोकांचे जीव वाचविण्यासाठी देशात पहिलाच साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करणारे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साखर कारखानदारीत एक प्रेरणादायी आर्दश निर्माण केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button