Ahamdanagar

एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण न झाल्याने शेवगाव आगाराच्या चालकाची एसटीच्या मागील शिडीला गळफास घेउन आत्महत्या ?

एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण न झाल्याने शेवगाव आगाराच्या चालकाची एसटीच्या मागील शिडीला गळफास घेउन आत्महत्या ?

सुनिल नजन अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथिल एसटी चालक दिलीप हरीभाऊ काकडे(वय५६) यांनी शुक्रवार दि.२९/१०/२०२१ रोजी शेवगाव येथील एसटी आगाराच्या आवारातील उभ्या असलेल्या एसटी बस क्र.MH 40 N 8849 या बसच्या मागील बाजूस असलेल्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. काकडे हे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सदस्य आहेत.एसटी कामगारांचा २७आँक्टोबर पासून सुरु असलेल्या संपास एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी घरभाडे आणि महागाई भत्त्यात २८% वाढ करून संप मिटवला. परंतु एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलगीकरण करावे ही मागणी मांन्य न झाल्याची माहिती प्रसार माध्यमातून काकडे यांना कळताच ते रात्री १० वाजता घरातून निघून थेट एसटी डेपोत गेले. संप सुरु असल्याने ते घरीच होते.त्यांनी चिडून जाउन रागाच्या भरात चक्क शेवगावच्या एसटी आगारात जाउन आत्महत्या करीत आपली जिवनयात्रा संपवली या बाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात म्रुत्युची नोंद करण्यात आली असुन उत्तरीय तपासणी नंतर म्रुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.पुढील तपास शेवगावचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. महाराष्ट्रातील ही एसटीच्या कर्मचाऱ्याची ही २९ वी आत्महत्या आहे. स्पेशल क्राईम रिपोर्टर, प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button