Aurangabad

माझी नोकरी’वेबसाईटच्या संचालकाला कॉपीराइट गुन्ह्यात पोलीस कोठडी

माझी नोकरी’वेबसाईटच्या संचालकाला कॉपीराइट गुन्ह्यात पोलीस कोठडी

उदय वायकोळे औरंगाबाद

औरंगाबाद : नोबल पब्लिकेशन, औरंगाबाद या प्रकाशन संस्थेच्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा काही भाग नक्कल करून आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केल्याच्या आरोपावरून माझी नोकरी संकेतस्थळाचे संचालक हार्दिक दिनेश सुतारी, रा. कात्रज, जि.पुणे यांच्यावर प्रकाशक व लेखक कारभारी कौतिकराव भुतेकर यांच्या तक्रारीवरून औरंगाबाद येथील सातारा परिसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६८, ४७१, ४८९ आणि कॉपीराईट कायदा कलम ६३ आणि ट्रेडमार्क कायदा कलम १०३ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

सदरील गुन्ह्यात चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा २७ फेब्रुवारी २०२१ वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. शृंगारे, तांबडे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे पुस्तकावर असलेला नोबल प्रकाशनचा वॉटरमार्क फिक्का करून त्यावर माझी नोकरीचा वॉटरमार्क टाकून नोबल प्रकाशन, औरंगाबाद यांची फसवणूक केल्या प्रकरणी सातारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button