Nashik

महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, नाशिक पदाधिकारीनी कणसरा मेडिकलला दिल्या सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, नाशिक पदाधिकारीनी कणसरा मेडिकलला दिल्या सदिच्छा भेट

सुशिल कुवर नाशिक

नाशिक : दि. ३१ जुलै नाशिक म्हसरूळ परिरातील वाढणे कॉलनीत किरण जयराम भरसठ MBA (Marketing) व सौ.प्रमिला किरण भरसठ (फार्मसी) मुळगाव कोल्हेर, पिंप्री दिंडोरी, नाशिक यांनी शासकीय नोकरीची अपेक्षा न करता आपल्या शिक्षणाचा वापर करून वाढणे कॉलनीत कणसरा मेडिकल सुरु केलेले आहे. खरं तर नाव बघूनच आदिवासीयतच्या पाऊल खुणा जागृत होतात. आदिवासी व्यक्ती धंद्यात यापूर्वी कधी येत नव्हता, एक लाजरा बुजरा मितभाषी अशी ओळख असलेला आपला माणूस हिच ओळख परंतू अलीकडे युवा धटिंग करतो आहे. आणि नुसता व्यवसायच नाही तर आदिवासीयत जपत आहेत ही अस्मिता आहे. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचेच थोडं दूर जावं लागेल पण आपल्या बांधवांचा धंदा वृंध्दीगत करणे आपलं कर्तव्यच. आज किरण दादाच्या मेडिकलला भेट देऊन त्याच्या हया व्यवसायाला बरकत मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी किरण दादाने सर्वांचा परिचय करून घेतला त्याची व्यावसायिकता व सामाजिकता जाणून घेतल्यानंतर खरोखर आनंद वाटला. यावेळी त्यांनी सांगितले की, कणसरा नांव बघून आडवी वाट करून बरेच आपले बांधव मेडिकलमध्ये आल्यावर ओळख काढतात. आज स्वतःहून आदिवासी माणूस आपली ओळख करून देतो आहे हेही त्याने आवर्जून सांगितले, कणसरा माता नावात किती दम आहे हेही लक्षात येते आहे. यावेळी नामदेव बागुल, किसन ठाकरे, काशिनाथ बागुल, जयराम गावीत, विजय पवार,चंद्रकांत आहेर,अनिल बागुल आदी उपस्थित होते. उत्तरोत्तर अशीच प्रगती आपण करीत रहा अशा शुभेच्छा सर्वांनी व्यक्त केल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button