Nandurbar

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नी कामकाजाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे केले कौतुक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नी कामकाजाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे केले कौतुक

फहिम शेख/नंदुरबार

मा. रुपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी आज दिनांक 10/02/2022 रोजी नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देवून महिला संबंधी दाखल गुन्ह्यांचा तसेच जिल्हा पोलीस दलाकडून महिलांशी निगडीत कामकाजाचा आढावा घेतला.
दिनांक 10/02/2022 रोजी दुपारी 03.00 वाजता मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथील जनसुनावणी कार्यक्रम संपवून मा. रुपाली चाकणकर, अध्यक्षा राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेसोबत आयोगातील सदस्य सचिव श्रीमती श्रध्दा जोशी यांचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आगमन झाले. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात त्यांचे स्वागत केले.मा. अध्यक्षा राज्य महिला आयोग यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला सहायता कक्ष तसेच नियंत्रण कक्षास भेट देवून तेथे चालत असलेल्या कामकाजाविषयी माहिती घेतली. त्यानंतर नंदुरबार शहरातील पोलीस अधिकारी तसेच इतर निमंत्रितांकरीता पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे आयोजीत कार्यक्रमात त्या उपस्थित राहिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मा रुपाली चाकणकर, अध्यक्षा राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेसोबत आयोगातील सदस्य सचिव श्रीमती श्रध्दा जोशी यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून स्वागत केले. त्यानंतर श्रीमती रुपाली चाकणकर यांनी महिलांविरुध्द् दाखल गुन्ह्यांचा तसेच हरविलेल्या महिला व मुली यांच्या मिसिंग प्रकरणांचा आढावा घेतला. महिलांविरूध्द् दाखल गुन्ह्यात पोलीस दलाकडून तात्काळ करण्यात आलेली कारवाई तसेच मिसिंग महिला व मुली मिळून येण्याच्या प्रमाणाबद्दल मा. रुपाली चाकणकर, अध्यक्षा राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मनोधैर्य योजनेंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यातील अत्याचाराग्रस्त पिडीतेस तात्काळ लाभ मिळवून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या, कौटुंबीक वादाच्या प्रकरणांत महिला सहायता कक्ष, नंदुरबार यांचेकडून समझोता घडवून आणण्यात आलेल्या 1) पलक विकी थाराणी रा नंदुरबार 2) गीता संदीप पाटील रा. सातुरखा ता. जि. नंदुरबार 3) सोनाली सुबोध जावरे रा. नंदुरबार 4) रामी गणपत गावीत रा. विसरवाडी यांचा ●आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पतीपासून विभक्त राहून स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या व कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या सक्षम महिला 1) श्रध्दा भेलांडे रा. नंदुरबार 2) आरती चौधरी रा. नंदुरबार 3) गायत्री समाधान कोळी रा. नंदुरबार यांचा आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव, मोलगी शहादा येथील कौटुंबीक हिंसाचाराने ग्रस्त महिलांना जिल्हा स्तरावर येवून तक्रार देणे सोयीचे होत नसल्याने जिल्हा स्तरावर कार्यरत महिला सहायता कक्षाव्यतिरिक्त तालुका स्तरावर नंदुरबार जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरावरील पोलीस ठाण्यांमध्ये महिला सहायता कक्ष स्थापन करणेबाबत नियोजीत प्रस्तावाचे श्रीमती रुपाली चाकणकर यांनी कौतूक केले. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात नंदुरबार शहर, नंदुरबार तालुका, नवापुर व शहादा येथील पोलीस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरु करण्यात येणार आहे. सुकाणू समिती आयुक्त कार्यालय, महिला व बालविकास विभाग, पुणे यांचेकडून परवानगी मिळताच सदरचे कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. सदर कक्षाकरीता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरचे समूपदेशन केंद्र आगामी काळात सुरु करण्यात येणार आहे.कायदेशीर कर्तव्या व्यतिरिक्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी कामाबद्दल श्रीमती रुपाली चाकणकर यांनी पोलीस दलाचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतून नंदरचार शहरातील माळी वाडा येथील विधवा महिला उज्वला चिंधा माळी यांना नाममात्र दरात जिल्हा पोलीस दलाच्या मालकीचा गाळा उपलब्ध करून देण्यात आला. त्यात त्यांनी सुरु केलेल्या कल्याणी व्हेजिटेबल्स या दुकानाचे श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button