Amalner

खा.शि.च्या प्रतापचे अजून काही “प्रताप”.. महाविद्यालयाच्या नापास विद्यार्थ्यांचे प्रकरण चिघळले.. युवा सेनेनेचे महाविद्यालयात आंदोलन…

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील नापास विद्यार्थ्यांचे प्रकरण चिघळले असून युवा सेनेनेही महाविद्यालयात जाऊन आंदोलन करून प्राचार्यांना जाब विचारला.

अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील नापास विद्यार्थ्यांचे प्रकरण चिघळले असून युवा सेनेनेही महाविद्यालयात जाऊन आंदोलन करून प्राचार्यांना जाब विचारला.
टी वाय बी एससी च्या तृतीय वर्षात काही विद्यार्थ्यांना हजर असूनही गैरहजर दाखवण्यात आले व प्रात्यक्षिक परीक्षेत नापास केले याविषयी अद्यापही तोडगा निघाला नाही म्हणून युवा सेनेने उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली देखील दांगडो करत प्राचार्यांना धारेवर धरले. महाविद्यालयाने आपली चूक कबूल करत लेखी द्यावे अशी मागणी लावून धरली होती. युवासेनेने देखील कार्यालयाला कुलूप लावले होते.दिव्या साळुंखे ही हजर असतानाही तिला नापास केल्याने ती देखील आंदोलनात सामील झाली होती. सकाळी ११ वाजता आंदोलन केल्यानन्तर पुन्हा प्राचार्यांनी दुपारी दोन वाजता चर्चेसाठी बोलावले होते. त्यांनंतर ही ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही म्हणून युवा सेना कार्यकर्ते अधिक चिडले होते. अखेरीस प्राचार्य पी आर शिरोडे यांनी सोमवारी विद्यापीठात जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही अशी भूमिका मांडून विद्यापीठाला योग्य निर्णय घेण्याची विनंती करतो हवे असल्यास प्रतिनिधींनी सोबत यावे असे संगीतल्यानन्तर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिव वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख शेखर पाटील , युवा सेना शहर प्रमुख अमर पाटील , युवती सेना तालुका प्रमुख दक्षता जाधव , शहर प्रमुख जयश्री बैसाणे, दीपिका पाने, मयुरी बागुल , सपना मोरे , धनश्री सणस आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button