Amalner

काल नटलेली पंचायत समिती ची नवरी आज झाली विधवा..!बंद दाराआड झालेल्या बैठकीत नवरीवर बलात्कार केल्यानंतर नवरा गेला मरून अशी आज अवस्था..!

काल नटलेली पंचायत समिती ची नवरी आज झाली विधवा..!बंद दाराआड झालेल्या बैठकीत नवरीवर बलात्कार की आणखी काही..!

अमळनेर येथील पंचायत समिती ला काल पीआरसी पंचायत राज समिती ह्या पथकाने भेट दिली.काल समिती येणार आहे म्हणून पंचायत समिती चे आवार नवरी सारखे नाटविण्यात आले होते. पण आज मात्र सर्वत्र कालची घाण कचरा पडलेला आढळून आला. पाण्याच्या बाटल्या,इतर कचरा सर्वत्र पडलेला होता.विशेष म्हणजे चाफ्याच्या नकली खोचलेल्या फांद्या मरगळुन उभ्या होत्या…पुन्हा कालची नटलेली पंचायत समिती चे आवार आज विधवेसारखे दिसत होते.जणू काही बैठकीत ह्या नवरीवर बलात्कार च करून नवरा रात्रीच मरून गेला अशी अवस्था आज दिसून आली.

जिल्हा परिषदेच्या निकृष्ट कामांच्या 13,14 15 व्या वित्त आयोगातून ग्राम पंचायत स्तरावर झालेल्या निकृष्ट ,अपूर्ण कामाच्या तक्रारी घेऊन अनेक लोक काल पंचायत समितीच्या आवारात उपस्थित होते.समितीची भेट घेऊन निवेदन देणार होते.परंतु समितीने लोकांना वेळ दिला नाही याची स्पष्टपणे नाराजी जनतेत आहे.या संदर्भातील अनेक तीव्र प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. ही समितीची बैठक बंद दाराआड घेतल्याने बैठकीतील मुद्दे व चर्चा सामन्य माणसाला कळू शकली नाही.

ही बैठक गुप्त पणे आणि बंद दाराआड घेण्या मागचे अजून कारण कळले नाही.पत्रकारांना आत प्रवेश देण्यात आला नाही.असे काय गुप्त खलबत होते की ही व्यक्तिगत बैठक होती हे समजले नाही.पंचायत राज समितीच्या आगमनामुळे लोकांना आशा होती की त्यांच्या समस्या ते ऐकून घेतील पण समितीने लोकांच्या समस्या ऐकून न घेता एका पदाधिकाऱ्याकडे जाण्यात धन्यता वाटली तर दुसरीकडे धनगर आरक्षणा संदर्भात निवेदन देखील स्विकारण्यात आले.अमळनेर तालुक्यात पंचायत समितीशी संबंधित सर्व च ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून अनेक ग्राम पंचायत नी तक्रारी देखील केल्या आहेत. तसेच भारत निर्माण योजना,रोजगार हमी योजना, शबरी घरकुल योजना,आदिवासी पारधी आवास योजना या संदर्भात खूप तक्रारी असून लोकांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे देखील आहेत.पण पंचायत समिती ही कोणालाही जुमानत नाही त्यामुळे काल आलेल्या पंचायत राज समितीकडून लोकाना अपेक्षा होत्या.पण अपेक्षभंग झाला आहे.

पंचायत राज समितीचा जाहीर निषेध
@अमळनेरला बंद दाराआड बैठक घेत अपेक्षाभंग
– तक्रारींची दखल नाही, जि.प.कडून झालेली अनेक कामं निकृष्ट, अपूर्ण तरीही बिले काढली आहेत. आमदारांच्या गावाला जाणारा रस्ता नुकताच केला असून तो “वैष्णवी कन्स्ट्रक्शन”ने निकृष्ट बनवल्याने उखडला आहे. तर जलनिस्सारणाचे कामच केलं नसल्याने ४० लाखांसह शेतशिवारही पाण्याखाली आहे. आमदाराच्या शुभहस्ते सपत्नीक भूमिपूजन झाले. आमदार व त्यांच्या जि.प.सदस्य पत्नी ज्यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला ते या रस्त्याने वापरतात पण वस्तुस्थिती दिसत नाही. हिगोणे, दोधवद आणि अमळगाव नागरिका, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
– शाम साहेबराव सोनवणे
मु.पो.अमळगाव

तसेच दोन दोषी अधिकाऱ्यांना जळगाव येथे बोलाविण्यात आले होते अशी ही माहिती मिळाली आहे. आता लोकांना उत्सुकता आहे की समिती नेमका काय अहवाल देते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button