Amalner

पांझरा नदीत कुत्र्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी मृतदेह..!

पांझरा नदीत कुत्र्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह..!

अमळनेर तालुक्यातील निम आवारातील पांझरा नदी पात्रात एका प्रौढा व्यक्ती चा मृतदेह १६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता आढळून आला.त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृत देहाची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रवींद्र रामसिंग कोळी हे बकऱ्या चारत असताना त्यांना एक मृतदेह आढळून आला.त्यांनी पोलीस पाटीलला कळविल्या नंतर मारवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पांझरा नदीत ४० ते ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह वाहून आला होता.सदर व्यक्तीचा मृत्यू ८ ते १० दिवसांपूर्वीच झाला असावा असा अंदाज आहे. कुत्र्यानी त्याच्या हातापायचे लचके तोडलेले आहेत त्यामुळे मृतदेहाची अवस्था खराब आहे.पोलीस पाटील उमाकांत मधुकर पाटील यांच्या माहितीवरून मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button