Amalner

वावडे येथील तरुणाचा आढळला विहिरीत मृतदेह..

वावडे येथील तरुणाचा आढळला विहिरीत मृतदेह..

अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील 31वर्षीय तरूणाचा विहिरीत मृतदेह आढळून आला. यासंदर्भात मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की राकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयताचा भाऊ सागट आधार पाटील हा विहिरीवर गेला असता त्याला निलेश आधार पाटील याचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानतंर वावडे येथील पोलिस पाटील दत्तात्रय ठाकरे, नीलकंठ ठाकरे, गोकुळ वानखेडे, संजय वानखेडे, आधार पाटील यांनी त्यास बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यावरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोना भटू सिंग तोमर कटीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button