Pune

सरडेवाडी गावात सापडला चार वर्षीय बालिकेचा मृतदेह

सरडेवाडी गावात सापडला चार वर्षीय बालिकेचा मृतदेह

दत्ता पारेकर पुणे

पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोळेकर वस्ती नजीक असणाऱ्या ब्राम्हण तळ परिसरात अंदाजे चार वर्ष वयाच्या बेवारस बालिकेचे मृत शरीर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हि घटना बुधवार दि.25 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताचे दरम्यान निदर्शनास आली. त्यामुळे ही हत्या की अन्य काही असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.यातील मृत बालिकेची ओळख अद्याप पटलेली नाही. शिवाय तिच्या मृत्यू चे नेमके कारण ही अद्याप समजलेले नाही.

या परिसरातील स्थानिक नगरिक आपली जनावरे चारण्यासाठी या परिरसात गेले असता त्यांना हे मृत शरीर आढळून आले. त्यांनी तात्काळ याची कल्पना गावचे सरपंच सिताराम जानकर यांना दिली. इंदापूर पोलीस विभागास ही याची कल्पना दिली.यानंतर सरपंच सिताराम जानकर, उपसरपंच हनुमंत जमदाडे,सदस्य सतिश चित्राव, रवींद्र सरडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.मात्र सदरची मृत बालिका स्थानिक नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानुसार सरडेवाडी टोल नाक्याची रुग्णवाहीका व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अविनाश बोरसे,विनोद पवार व टोलचे कर्मचारी सलमान पठाण,राहुल कदम,अनिल तरंगे हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी सदरील मृत शरीर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयत येथे पुढील तजवीज कामी दाखल केले.

संबंधित लेख

Back to top button