India

आरोग्याचा मूलमंत्र…भाग -2 होय..! सेक्स मुळे ताण-तणाव कमी होतो…!

आरोग्याचा मूलमंत्र…होय..! सेक्स मुळे ताण-तणाव कमी होतो…!

आपल्या भारतात सेक्स हा शब्द नुसता उच्चारला तरी अनेकांच्या भुवया उंचावतात.सेक्स किंवा प्रणय ही अत्यन्त खाजगी आणि चोरून करण्याची बाब मानली जाते.कित्येक लोकांचा गैरसमज असतो की सेक्स करणे म्हणजे काही तरी वाईट गोष्ट आहे किंवा पाप आहे. हे सर्व रूढ़िवादी व संकुचित विचारसरणीतुन लोकांच्या मनावर शतकानुशतके बिम्बवले गेले असल्याने सेक्स विषयी अपराधीभावना मनात उत्पन्न होते.पण सेक्स ही एक नैसर्गिक क्रिया आहे. सेक्स (कामक्रीड़ा किंवा सम्भोग) मध्ये वाईट किंवा अपराधी अस काही नसून निसर्गाच्या सर्जनशीलतेच सुंदर अविष्कार म्हणजे सेक्स आहे.. संपूर्ण जगात आणि भारतात जी प्रचंड लोकसंख्या आहे ती सेक्स ची निर्मिति आहे..आपण सर्व सेक्स मधून निर्माण झालो आहोत. मग सेक्स करने, सेक्स सम्बन्धी विचार करने, सेक्स विषयी बोलने हे वाइट कस असू शकते याउलट, सेक्स (कामक्रीड़ा) व हस्तमैथुन याचे आरोग्याला काही अंशी महत्वाचे आहेत.
आपल्या दैनंदिन जीवनात कौटुंबिक जबाबदाऱ्या, ऑफिस,व्यवसाय, प्रवास ,शिक्षण, स्पर्धा , बाजार, प्रेमप्रकरण, आयुष्यातील संकटे सर्वच गोष्टीमुळे मनावर ताण तणाव निर्माण होतो.अनेक गोष्टी मानवाला त्याच्या मनाविरुद्ध कराव्या लागतात.त्यामुळे क्रोनिक तणाव निर्माण होतो हा प्रत्येक माणसात असतो.ह्या तणावामुळे ब्लडप्रेशर, अनिद्रा, भूक न लागने, असे समस्या निर्माण होऊन शारीरिक आजार निर्माण होतात. मानसिक तानतनाव (स्ट्रेस) व त्यातून निर्माण होणारे नैराश्य (डिप्रेशन) हे थेट आत्महत्या पर्यन्त पोहचतात.

सेक्स (कामक्रीड़ा)ची तणाव कमी करण्यात भूमिका

होय..!सेक्स चा मानसिक ताणतणाव दूर होण्यास खूप मदत होते. सेक्स किंवा हस्तमैथुन केल्याने वास्तविक स्त्रीपुरुष दोघांचही मन व शरीर हे तणावरहित शांत (रिलॅक्स) ताजेतवाने होतात. सेक्स करताना मनुष्य काही क्षण सर्व विसरून जातो त्यामुळे मन हे अधिक स्थिर व स्वकेंद्रित होत या अवस्थेत जगातील कितीही महत्वाच दुःख असू दे, मनुष्य क्षणभर ते विसरतो. आणि मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.

वास्तविक हे सर्व शरीरातील विशिष्ट “हार्मोन” या घटकांमुळे घडते.
एंडोर्फिन (endorphin) – सेक्स करताना शरीरात एंडोर्फीन नावाचा हार्मोन चा अधिक वाढतो .या हार्मोन मुळे शरीरातील मांसपेशी व मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. सेक्स किंवा हस्तमैथुन केल्यानंतर शांत वाटत ते या हार्मोन मुळे वाटत असते.

सेक्स हार्मोन – FSH, LH, इस्ट्रोजेन ,प्रोजेस्टेरोन, टेस्टेस्टेरोन हे काही हार्मोन आहेत जे स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीरांत कमी अधिक प्रमाणात निर्माण होत असतात. टेस्टेस्टेरोन हे पुरुषांच्या शरीरात अधिक व स्त्रिंयांच्या शरीरात अल्प प्रमाणात असते. इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन हे स्त्रियांच्या शरीरांत पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात असतात.

सेक्स करताना पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्टेरोन च प्रमाण वाढत आणि स्त्रियांच्या शरीरात अल्प प्रमाणात टेस्टेस्टेरोन वाढते. टेस्टेस्टेरोनमुळे सेक्स किंवा हस्तमैथुन केल्यानंतर ताजेतवाने व ऊर्जावान वाटते. आणि मन आनन्दी होते.

डोपामाईन (dopamine)– सेक्स करताना डोपामाईन या नुरोट्रान्समीटर घटकांचं प्रमाण वाढल्याने देखील मन आनंदी होते किंवा सुख मिळते.
ऑक्सिटोसिन (oxytocin)- या हार्मोन ला प्रेम (love)हार्मोन देखील म्हणतात. सेक्स करताना जे लैंगिक क्रिया केले जातात जसे चुम्बन घेणे, मीठी मारने या सर्व क्रिया करताना ऑक्सीटोसिन हा हार्मोन निर्माण होत असतो. ऑक्सीटोसिन मुळे स्त्री व पुरुष दोघांना शांत झोप लागते. स्त्रीयांमध्ये ऑक्सीटोसिन चा प्रजनन क्रियेत महत्वाचा योगदान असते. तर ह्या पद्धतीने सेक्स किंवा हस्तमैथुन केल्याने मनावरील ताण तणाव दूर होण्यास मदत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button