Walchandnagar

स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन

स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन

अमोल राजपूत

वालचंदनगर : तालुका इंदापूर वालचंदनगर श्री
स्वामी समर्थांच्या जयघोषात मंगळवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याचा निरोप घेऊन पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर येथे श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळ्याचे आगमन झाले. भाविकांनी स्वामींच्या पालखीचे भक्तिमय स्वागत केले . दारोदारी सडा रांगोळी काढून हातात आरती निरजनी घेऊन पालखीचे स्वागत केले. वालचंदनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मेन काॅलनी, नवीन बाजारपेठ, येथे ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन

सायंकाळी ललिताबाई मंगल कार्यालयात पालखी मुक्कामाला थांबली. वालचंदनगरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्या चे आगमन होत असते . यंदाचे पालखी सोहळ्याचे २१ वे वर्षे असून संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावीच्या स्वामी भक्ताना समर्थांचे दर्शन घेता यावे, म्हणून पराक्रमा चालू केली आहे. गणेश जयंती दिवशी पालखी सोहळ्याचे वालचंदनगरीत आगमन झाल्याने परिसरातील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महिला लहान मुलासह ज्येष्ठांनी या सोहळ्यात सहभाग घेतल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. तर संपूर्ण परिसर स्वामी समर्थांच्या जयघोषात दुमदुमला होता. सायंकाळी ५ वाजता वालचंदनगर येथील हनुमान मंदिर पालखी दर्शनासाठी विसावा घेण्यात आली. त्या ठिकाणी सुहास पटवर्धन, सचिन उरणकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रात्री ७ वाजता श्री स्वामी समर्थ अक्कलकोट प्रणित, स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगर यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट )चे संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले याना मंडळाचे अध्यक्ष रमेश देशपांडे यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अक्कलकोट प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, भूमाता ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई, इंदापूर तालुका तहसीलदार सोनाली मेटकरी , वालचंदनगर प्रजापिता ब्राह्माकुमारी ईश्वरी शाखा संचालिका ब्रह्माकुमारी सुवर्णा दिदी ,महाबळेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते व उधोजक भावेश भाटिया, माजी पोलीस उपनिरीक्षक मोहन यादव , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले याच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
(यावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई म्हणाल्या की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नाव अखिल भारतात धार्मिक व सामाजिक कार्यामुळे झालेला आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट च्या विकासाचे न्याय हे प्रतिबिंब आहे. सामाजिक बांधिलकीचा आदर्श असल्याचे सांगून देसाई यांनी पालखी परीक्रमेस शुभेच्छा व्यक्त केले.

स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन

यावेळी भावेश भाटिया, मोहन यादव, यांनी देखील समोचीत भाषण केले. रात्री ८ वाजता ललिताबाई लालचंद मंगल कार्यालयात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले याच्या हस्ते आरती व महाप्रसाद करण्यात आली.

स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन

यावेळी बारामती त्रिवेणी ऑईल मिलच्या संचालिका व पोलिस मित्र परिवार संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यिका सौ. शुभांगी मुंडे – चौधरी , जेष्ठ सल्लागार अतुल तेरखेडकर, डाॅ विकास शहा, राम कुंभार, राजू भाटिया, जितू दुरुतकर , श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे उपाध्यक्ष वैभव कदम, सचिवअमोल राजपूत, खजिनदार निलेश चव्हाण, संचालक अमरसिंह निंबाळकर, विजय कांबळे, राहूल गोडसे, शितल पवार, उमेश सगरे,शंकर काटे, हणमंत कुंभार, खंडू कुंभार,सर्व स्वामी भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कुलकर्णी यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button