sawada

त्रस्त शेतकर्‍यांनी अखेर सावद्यात केले रस्ता रोको आंदोलन

त्रस्त शेतकर्‍यांनी अखेर सावद्यात केले रस्ता रोको आंदोलन

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिनावल येथील शेत शिवारात १९ फेब्रुवारीपासून ते २७ फेब्रुवारीदरम्यान काही पिक चोरट्यां कडून शेतकऱ्यांचे उभ्या पिकांची नासधूस व शेती उपयोगी सामग्रीच्या चोऱ्यांच्या सत्र थांबता थांबेना यासंदर्भात वेळोवेळी शेतकऱ्यांनी सावदा पोलीस व निभोंरा पोलीस स्टेशन सह उपविभागीय अधिकारी फैजपूर यांच्याकडे लेखी तक्रारी देऊन व्यथा देखील मांडल्या मात्र सदरील प्रकार थांबता थांबेना आज दि.२७ फेब्रुवारी रोजी चीनावल येथील बळीराम आनंदा नेमाडे व प्रमोद खुशाल भंगाळे यांच्या शेतातील २ लाखांचे टिंबक नळ्या जाळून टाकण्याचा प्रकार घडल्याने मोठ्या संख्येने त्रस्त शेतकऱ्यांनी सावदा येथे बस स्थानक समोरील पोलीस चौकीच्या ठिकाणी जवळपास दोन तास रस्ता रोको आंदोलन करतांना स्थानिक पोलिसांवर रोष व्यक्त करुन त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण कत्यावेळी एपीआय देविदास इंगोले यांची बदली व्हावी.अशी मागणीदेखील संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. यादरम्यान त्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने श्रीकांत सरोदे यांनी तीव्र स्वरूपात सदरील घटनाक्रम घेऊन झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत असताना संतप्त शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आव्हान देखील त्यांनी त्यावेळी केले.याप्रसंगी फैजपूर येथील सत्पती मंदिराची महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.सावदा स्वामीनारायण मंदिरचे महाराज भक्ती किशोर प्रसाद खासदार रक्षा खडसे,रावेर यावल तालुक्याचे आमदार शिरिष चौधरी यांनी रस्ता रोको आंदोलन येथे येऊन त्रस्त शेतकऱ्यांची हतबलता बघून जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून सदरील प्रकार तात्काळ मार्गी लावण्यासाठी सांगितले यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे शेतकऱ्यांचे आंदोलना ठिकाणी आले असता त्यांनी यावेळी शेतकऱ्यांची समजूत घालून सदरील प्रकारा गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या पथकाकडून तात्काळ मार्गी लावून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केले.यानंतर दोन तासापासून सुरु असलेला शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलनाचा समारोप झाला. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे,रावेर पी.आय कैलास नागरे,फैजपूर एपीआय आखेगावकर,ए.एस. आय.सांगळे फैजपूर निंभोरा एपीआय धुमाळ,सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय इंगोले, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, राजेंद्र पवार,ए.एस.आय मेहमूद शाहा,पो कॉ उमेश पाटील, गोपनीय वि.पोलीस यशवंत टहाकडे,संजू चौधरी,मेहरबान तडवी, दंगा नियंत्रण पथक यांनी चोख बंदोबस्त दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button