Nagpur

अभाविपचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे २५ व २६ डिसेंबर २०२० ला संपन्न होणार

अभाविपचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे २५ व २६ डिसेंबर २०२० ला संपन्न होणार

अमळनेर अभाविपचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे २५ व २६ डिसेंबर २०२० ला संपन्न होणार आहे. सदर अधिवेशानाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मा.भैय्याजी जोशी भाषण सत्रास वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अधिवेशन तालुका प्रमुख प्रगती काळे यांनी दिली. सदर अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हे अमळनेर शहरात गं.स.हायस्कुल येथील IMA सभागृह या ठिकाणी २५ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत करण्यात येणार आहे. यावेळी अभाविप कार्यकर्ते, अभाविप पूर्व कार्यकर्ते, अभाविप हितचिंतक उपस्थित राहणारा आहेत ही माहिती शहरमंत्री केशव पाटील यांनी दिली.
यावेळी ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे पोस्टर प्रकाशन अभाविप राष्ट्रीय अधिवेशन तालुका प्रमुख प्रगती काळे, शहरमंत्री केशव पाटील, सह मंत्री वैभव पाटील, जिल्हा एसएफएस प्रमुख निलेश पवार,अक्षय राठोड,राकेश बोरसे,नरेंद्र देसले, पवन सातपुते, हितेश पाटील, सागर पाटील,आदी कार्यकर्ते यांच्या हस्ते कार्यालयात करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button