sawada

सावद्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती झाली उत्साहात साजरी

सावद्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती झाली उत्साहात साजरी

भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त आज श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात सकाळी ७ वा. नित्य अभिषेक पूजन विशेष भक्तगणांच्या हस्ते झाले. नंतर शहरात भगवान महावीर या़ंची जैन भजन म्हणत व जय घोष करीत पालखी मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत जैन मंदिराचे सर्व ट्रस्ट व महिलांसह युवक,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावदा शासकीय विश्रामगृह ठिकाणी लेवा जगतचे संपादक श्याम पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील पत्रकार बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली.व विनम्र अभिवादन करून जयंती साजरी केली.
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे कोरोना महामारीचा काळ संपुष्टात आल्याने २ वर्षानंतर देशाचे संविधान रचयिते तसेच”फक्त वही-पेन म्हणजे शिक्षण नव्हे,तर बुद्धीला सत्यकडे,भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.”असे ब्रीद वाक्यला अनुसरून जीवनाची वाटचाल करावी हे मंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज १४ एप्रिल रोजी सकाळी ९-वाजता बसस्थानक समोरील असलेल्या त्यांच्या भव्य स्मारकावर पुष्पमाला अर्पण करून साहेबांना विनम्र अभिवादन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अनिता येवली,माजी उपनगराध्यक्षा नंदाताई मिलिंद लोखंडे,डॉ.प्रिया सरोदे,रेखाताई वानखेडे,मीनाक्षी कोल्हे,माजी नगरसेवक सिद्धार्थ बडगे, एपीआय देविदास इंगोले,गजू सर,भीमराव लोखंडे सर,प्रकाश लोखंडे सर,सुभद्राबाई बडगे, सतीश लोखंडे,पंकज येवले, इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानंतर डॉ.अतुल सरोदे यांच्यासह शहर भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देऊन त्यांच्या पुतळ्याला आदरपूर्वक पुष्पमाला अर्पण केले.तरी या ठिकाणी तिरंगा रिक्षा स्टॉप तर्फे मोतीचूरचे लाडू सह पोहाचे वाटप देखील करण्यात आले.तसेच संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली.यावेळी चॉंदनी चौकात मुस्लिम तरुणांनी थंड पिण्याचे पाणीची व्यवस्था ठेवली होती. तसेच मिरवणुकीत सामील झाले होते. डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त चौकात मोठ मोठे होर्डिंग बोर्ड देखील लावले. त्यानंतर मेहकर कॉलनीतील राम भैय्या मित्र मंडळ तर्फे गांधी चौकात थंड शरबतचे वाटप देखील करण्यात आले.याप्रसंगी मोठ्या संख्येने महिलांसह पुरुष व युवक,युवती हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button